Join us

...फरहानने नंतर मानले मुंबई पोलिसांचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 7:09 PM

नाराज फरहानने मुंबई पोलिसांचे ट्विट करून मानले आभार 

मुंबई -  बॉलिवूड अभिनेत्री आएशा टाकियाला फोनवरुन धमकी मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. आएशाचा पती फरहान आझमी याने याबाबत एक ट्विट केलं असून त्याची पत्नी, आई आणि 7 महिन्यांच्या गरोदर बहिणीला फोनवरुन धमक्या मिळत असल्याचे त्या ट्विटमध्ये म्हटले होते. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतल्यानंतर फरहानने कायदा व सुव्यवस्थेचे सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांचे ट्विटद्वारे आभार मानून मुंबई पोलिसांवर विश्वास असल्याचे नमूद केले आहे. फरहान याने या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुंबई पोलिसांचे परिमंडळ -९ चे पोलीस उपायुक्त परमजित दहिया यांनी त्याच्या फोनला किंवा मेसेजला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने खंत व्यक्त केली होती. तसेच, फरहानने त्यांचे बॅंक अकाऊंटही फ्रिज झाले असल्याचेही ट्विटमध्ये म्हटले होते. मात्र,पोलिसांनी दखल घेतल्यानंतर फरहानने सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांचे आभार मानले. 

फरहान याने सांगितलं की, एका केसशी निगडीत व्यक्तीकडून या धमक्या मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच बातमी आली होती की, फरहानवर त्याचा माजी बिझनेस पार्टनर काशिफ खान याने फसवणूक केल्याचा आरोप केला होता. काशिफने फरहान विरोधात बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये एआयआर दाखल केला होता. फरहान याने काल रात्री या धमक्यांना वैतागून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांना पोस्टमध्ये टॅग करत त्यांच्या मदतीची मागणी केली होती.  

टॅग्स :मुंबईगुन्हासोशल मीडियाअबू आझमीपोलिस