भाग्यश्री प्रधान , ठाणेडॉक्टरांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १ जुलै रोजी देशभर ‘डॉक्टर डे ’ १९९१ पासून साजरा करण्यात येतो. हा दिवस पश्चिम बंगालचे तत्कालीन मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांच्या स्मृतीप्रित्यर्थ साजरा केला जातो. ते भारतातील ज्येष्ठ फिजिशियन होते. १९६१ साली भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. कोलकत्ता येथे मेडिकल शिक्षण घेतल्यानंतर लंडन येथे त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले. तसेच भारताच्या स्वातंत्र्यासाठीही त्यांनी हातभार लावला आहे. अशा या भारतरत्न डॉक्टरांच्या जन्म व मृत्यूदिनाची आठवण म्हणून १ जुलै हा दिवस ‘डॉक्टर डे’ म्हणून साजरा करण्यात येतो. दिवसेंदिवस भारतात आयुर्विज्ञानात प्रगती होत आहे. व्यक्तीगत आयुष्याची पर्वा न करता रुग्णाच्या सहायार्थ कोणत्याही क्षणी धाऊन प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्या डॉक्टरांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा होतो. डॉ. शरदकुमार दीक्षित, तात्याराव लहाने, प्रकाश व विकास आमटे, डॉ. कोटणीस, डॉ. पुरंदरे, डॉ. राणावत, डॉ. हिंदुजा अशा अनेक सेवाव्रती डॉक्टरांमुळे अनेकांचे आयुष्य उजळले आहे. या डॉक्टरांचे कर्तृत्व दीपस्तंभासारखे आहे. अशा डॉक्टरांप्रती या दिवशी कृतज्ञता व्यक्त होते.-प्रत्येक देशात हा दिवस वेगवेगळ्या तारखेला साजरा होतो. ३० मार्च १९३३ साली दिवशी जनरल अॅनेस्थेशिया देऊन आॅपरेशन करण्याची सुरुवात झाली होती. यानिमित्ताने सगळ्यात प्रथम ‘डॉक्टर डे ’या संकल्पेनेची सुरुवात जॉर्जिया येथे डॉ. चार्लस अलमंड यांनी केली. त्यानंतर मात्र सगळेच देश एकत्र येऊन १ जुलै रोजी हा दिवस साजरा करतात.
डॉक्टर डे च्या निमित्ताने थँक्यू डॉक्टर...
By admin | Published: June 30, 2015 10:31 PM