Join us

धन्यवाद! माझे पेन्शन खाते उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 4:06 AM

मुंबई : जवळपास तीन आठवडे खेपा घालूनही गोकुळधामच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेकडून परिचरिकेचे पेन्शन खाते उघडण्यास टाळाटाळ ...

मुंबई : जवळपास तीन आठवडे खेपा घालूनही गोकुळधामच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेकडून परिचरिकेचे पेन्शन खाते उघडण्यास टाळाटाळ केली जात होती. याची दखल ‘लोकमत’ने घेत याबाबतचे वृत्त छापले आणि अवघ्या दोन दिवसात त्यांचे खाते उघडून मिळाल्याने त्यांनी गुरुवारी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.

गोकुळधामच्या स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेत त्यांना पेन्शन खाते उघडून मिळाले. केईएम रुग्णालयात परिचारिकेने तीन आठवडे यासाठी खेपा घातल्या. मात्र, त्यांना दरवेळी नवीन कारणे देत परत पाठविले जात होते. अखेर कंटाळून त्यांनी याबाबत ‘लोकमत’कडे व्यथा मांडली. ‘पेन्शन खात्यासाठी बँकेकडून तारीख पे तारीख’ या मथळ्याखाली १६ जुलै २०२१ रोजी वृत्त छापले. त्यानंतर बँकेने याची दखल घेत प्राथमिकतेने परिचारिकेला पेन्शन खाते उघडून दिले. ‘मला रुग्णालय प्रशासनाकडे कागदपत्रे जमा करायची होती. ज्यात बँक खाते क्रमांकाचादेखील समावेश होता. याप्रकरणी ‘लोकमत’ने मला सहकार्य केले म्हणून मी त्यांची आभारी आहे’, असे या परिचारिकेने म्हटले. वृद्धापकाळात दूरच्या शाखेत पेन्शन घेण्यासाठी जाणे त्रासाचे ठरले असते. म्हणूनच घराजवळील बँकेच्या शाखेत मी खाते उघडण्यासाठी धडपडत होते, असेही त्या म्हणाल्या.