ठाणो : ठाणो मेट्रोच्या मार्गातले जवळपास सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. ओवळा येथील कारशेडच्या जागेचा सव्र्हे एमएमआरडीए येत्या आठवडय़ात सुरू करत असून, स्थानिकांना योग्य मोबदल्याचे आश्वासन मिळाल्यामुळे त्यांचा विरोधसुद्धा जवळपास मावळला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी मेट्रोसाठी आवश्यक असलेली टेंडर प्रक्रिया पूर्ण करून एमएमआरडीएने प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आ. एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महापौर हरिश्चंद्र पाटील, खासदार राजन विचारे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांची भेट घेतली. त्या वेळी ठाणो मेट्रो प्रकल्पातील अडथळ्यांवर कशी मात करता येईल याबाबतची चर्चा झाली. या बैठकीला एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजय सेठी, ठाणो पालिकेचे आयुक्त असीम गुप्ता आदी उपस्थित होते. या मेट्रो रेल्वेचा आराखडा आणि प्रस्ताव तयार असून, केवळ कारशेडची जागा ताब्यात येत नसल्यामुळे अडथळा असल्याचे मदान यांनी सांगितले.
ठाणो महापालिकेने ओवळा येथील 4क् हेक्टर जागा मेट्रो कारशेडसाठी आरक्षित केली आहे. जागा मालक शेतक:यांना योग्य मोबदला मिळण्याची हमी नसल्याने ते एमएमआरडीएला सव्र्हे करू देत नव्हते. मात्र, या जागा मालक शेतक:यांना एकास एक टीडीआर देणो शक्य असल्याचे आयुक्त असीम गुप्ता यांनी स्पष्ट केले. तसेच, सिडकोच्या धर्तीवर विकसित भूखंड देणो किंवा वर्सोवा येथील प्रकल्पाच्या धर्तीवर एमएमआरडीएने येथील विकास योजनांसाठी अतिरिक्त एफएसआय देत त्यातून स्थानिकांना मोबदला देण्याबाबतही विचार करावा असा प्रस्ताव शिवसेनेच्या नेत्यांनी मांडला. योग्य मोबदला मिळत असेल तर आम्ही सव्र्हे आणि भूसंपादनासाठी सहकार्य करायला तयार असल्याचे बैठकीला उपस्थित असलेले शेतक:यांचे प्रतिनिधी दत्तू पाटील आणि साजन कासार यांनी स्पष्ट केले.
या सव्र्हेक्षणासाठी एमएमआरडीएला आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी या वेळी दिले. तसेच, कासारवडवलीर्पयत प्रस्तावित असलेली मेट्रो पुढे दहिसर्पयत नेण्याची मागणी करत, त्यासाठी आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी केली. (विशेष प्रतिनिधी)
च्ठाणो शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी ठाणो पालिकेकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना सहकार्य करण्याचे आश्वासनही या वेळी मदान यांनी दिले.
च्या अंतर्गत वाहतूक योजनेच्या सव्र्हेसाठी एमएमआरडीए ठाणो पालिकेला सर्वतोपरी मदत आणि मार्गदर्शन करण्यास तयार असल्याची ग्वाही एमएमआरडीए आयुक्तांनी दिली.