‘महाराष्ट्र श्री’चा थरार वांद्रेमध्ये रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 02:21 AM2018-02-05T02:21:33+5:302018-02-05T02:26:02+5:30
राज्यातील शरीरसौष्ठवपटूंचे स्वप्न असलेल्या ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेची रोमांचक लढत २४ आणि २५ फेब्रुवारीदरम्यान वांद्रे येथे रंगणार असून यंदाच्या किताब विजेत्या शरीरसौष्ठवपटूवर दीड लाख रुपयांच्या रोख बक्षिसाचा वर्षाव होणार आहे.
मुंबई : राज्यातील शरीरसौष्ठवपटूंचे स्वप्न असलेल्या ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेची रोमांचक लढत २४ आणि २५ फेब्रुवारीदरम्यान वांद्रे येथे रंगणार असून यंदाच्या किताब विजेत्या शरीरसौष्ठवपटूवर दीड लाख रुपयांच्या रोख बक्षिसाचा वर्षाव होणार आहे. तसेच, विजेत्या खेळाडूला मोटारसायकल पटकावण्याची संधीही यंदा मिळणार असल्याने खेळाडूंची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ‘महाराष्ट्र श्री’सोबतच यंदा तिसºयांदा फिजीक स्पोटर््स ही विशेष स्पर्धाही रंगेल.
महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेच्या वतीने वांद्रे येथील शासकीय वसाहतीमधील पीडब्ल्यूडी मैदानात होणाºया या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. एकूण १० वजनी गटांमध्ये होणाºया या स्पर्धेतील प्रत्येक गटाच्या अव्वल ५ खेळाडूंना अनुक्रमे १५, १२, १०, ८ आणि ५ हजार रोख रुपयांच्या पारितोषिकाने गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेच्या उपविजेत्या खेळाडूला ५० हजार, तर द्वितीय उपविजेत्या खेळाडूला २५ हजार रुपयांनी सन्मानित करण्यात येईल. फिजीक स्पोटर््स या विशेष गटातील विजेत्या पुरुष व महिला खेळाडूंनाही रोख पारितोषिकांनी गौरविण्यात येईल. राज्यभरातून मोठ्या संख्येने सहभागी होणाºया या स्पर्धेत सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असेल तो मुंबईकर आणि विद्यमान महाराष्ट्र श्री सुनीत जाधव. विशेष म्हणजे आतापर्यंत सलग चारवेळा या स्पर्धेचे जेतेपद पटकावलेला सुनीत यंदा पाचव्यांदा बाजी मारणार का, हे पाहण्याची उत्सुकता शरीरसौष्ठवप्रेमींमध्ये लागली आहे. २०१४ साली अंधेरी येथे पहिल्यांदा महाराष्ट्र श्री ठरल्यानंतर गतवर्षी ठाण्यामध्ये झालेल्या स्पर्धेत सुनीतने जेतेपदाचा चौकार मारला होता.
>मुंबईकरांमध्येच टक्कर!
सुनीत जाधव संभाव्य विजेता असला तरी, जेतेपद आपल्याकडे राखणे त्याच्यासाठी सोपे राहणार नाही. यासाठी त्याला मिस्टर वर्ल्डमध्ये सुवर्ण कामगिरी करणारा महेंद्र चव्हाणच्या मुख्य आव्हानाला सामोरे जावे लागेल. त्याचप्रमाणे मुंबई श्री अतुल आंब्रे, भारत श्री अक्षय मोगरकर आणि अनुभवी सागर कातुर्डे यांचेही तगडे आव्हान सुनीतपुढे असल्याने महाराष्ट्र श्री स्पर्धेत यंदा मुंबईकरांमध्येच मुख्य स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. शिवाय १८ फेब्रुवारीला रंगणाºया मुंबई श्री स्पर्धेत हे सर्व खेळाडू राज्य स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी सहभागी होणार असल्याने मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.