राज ठाकरेंविरोधात सापळा रचला नाही; बृजभूषण यांचे ते वैयक्तिक मत, भाजपाकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 11:10 AM2022-05-24T11:10:34+5:302022-05-24T11:14:38+5:30

प्रवीण दरेकर यांनी ट्विट करुन भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे. 

That is MP BrijBhushan's personal opinion about MNS chief Raj Thackeray, says BJP leader Praveen Darekar | राज ठाकरेंविरोधात सापळा रचला नाही; बृजभूषण यांचे ते वैयक्तिक मत, भाजपाकडून स्पष्टीकरण

राज ठाकरेंविरोधात सापळा रचला नाही; बृजभूषण यांचे ते वैयक्तिक मत, भाजपाकडून स्पष्टीकरण

Next

मुंबई- आत्ता जे उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत, आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. तुम्हाला आता जाग आली का?, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरेंनीभाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांना विचारला. अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. त्यामुळे अयोध्या दौरा रद्द केल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली. 

राज ठाकरेंच्या या विधानानंतर महाराष्ट्रातील भाजपानेच हा सापळा रचल्याचा आरोप काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला होता. मात्र सचिन सावंत यांचा हा आरोप भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी खोडून काढला आहे. प्रवीण दरेकर यांनी ट्विट करुन भाजपाची भूमिका स्पष्ट केली आहे. 

राज ठाकरे यांच्या विरोधात भाजपाने अजिबात सापळा रचलेला नाही किंवा रचायचे काही कारण नाही. बृजभूषण सिंह यांचे ते वैयक्तिक मत होते. भाजपा उत्तर प्रदेश किंवा भाजपा महाराष्ट्र यांच्याकडून अशासंदर्भात कुठलीही अनधिकृत किंवा अधिकृत भूमिका आलेली नाही. त्यामुळे भाजपाच्या हिंदुत्वाच्या विचारधारेला जर कुणी साजेशी भूमिका घेत असेल तर त्यांचे स्वागतच होईल, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीसाठी तिथून हजारो लोक महाराष्ट्रात रेल्वे स्टेशनवर आले. आपले लोक त्यांच्याशी बोलायला गेले होते. तिथे बोलता बोलता त्या बाचाबाचीत तिथल्या एका मुलाने आपल्या एका पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. आणि जे सगळं प्रकरण सुरू झालं. ते तिथून झालं, असंही राज ठाकरे परप्रांतियांबाबत म्हणाले.  

तुमच्या सोयीसाठी कशाला राजकारण बदलताय?- 

आमच्या महाराष्ट्रात एमआयएमची औलाद येते आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकतात. आम्हाला लाज, शरम वाटत नाही. कारण सत्ताधारीच असे बसलेत. औरंगजेब हा जर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांना सुफी संत वाटत असेल तर काय बोलायचं? तुमच्या सोयीसाठी कशाला राजकारण बदलताय?, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. 

Web Title: That is MP BrijBhushan's personal opinion about MNS chief Raj Thackeray, says BJP leader Praveen Darekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.