Join us  

'तो खूप मोठ्या मनाचा माणूस'; CM शिंदेंनी सांगितली फडणवीसांची २ उदाहरणं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 3:52 PM

तसेच, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुंबई - शिवसेना शिंदे गट आणि भाजपात अंतर्गत धुसफूस सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. वर्तमान पत्रात आलेल्या जाहिरातीवरुन हे शीतयुद्ध रंगल्याचं सांगण्यात येत होतं. त्यातच भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शीतयुद्ध किंवा अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी याबाबत मनातील भावनात स्पष्टपणे सांगताना देवेंद्र फडणवीस यांच्या मनाचा मोठेपणा दोन उदाहरणांसह सांगितला. तसेच, आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे शिवसेना शिंदे गटातील आमदार नाराज आहेत, तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही मतभेद असल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदेंची लोकप्रियता वाढल्याच्या जाहिराती वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या, तेव्हापासून दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा घडत मात्र, त्यावर, आता स्वत: एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण दिलंय. 

माझ्यात आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये कुठलंही शीतयुद्ध नाही, कुठलेही मतभेद नाहीत. तो खूप चांगल्या मनाच, मोठ्या मनाचा माणूस आहे, आणि मीही हार्डकोअर पॉलिटीशियन नाही, मी संवेदनशील माणूस आहे. मी खुर्चीसाठी कुठलीही तडजोड, विचारांशी, तत्त्वांशी करणारा माणूस नाही, जे पूर्वी झालंय, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले. तसेच, देवेंद्र फडणवीस आणि आपल्यात कुठलेही मतभेद नाहीत हे सांगताना देवेंद्र फडणवीस यांच्या मोठेपणाचे दोन उदाहरणंही त्यांनी दिली. 

मला मुख्यमंत्री करताना देवेंद्रजींचं योगदान आहे ना, त्यांचा सिंहाचा वाटा आहे ना, मनाचा मोठेपणा दाखवला ना त्यांनी. आता, अजित पवार आल्यानंतर ते स्वत: उपमुख्यमंत्री होते, पण आणखी एक उपमुख्यमंत्री स्वीकारला ना त्यांनी. राजकारणात काही गोष्टी करायला धाडस लागतं आणि ते पचवायलाही मोठं मन लागतं, ते त्यांच्याकडे आहे, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या मनाचा मोठेपणा दोन उदाहरणांसह स्पष्ट केला.  

टॅग्स :एकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसअजित पवार