Join us  

तो व्हिडीओ एडिट केलेला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 9:09 AM

Mumbai: मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई - मराठा आरक्षणासंदर्भात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु, हा व्हिडीओ संपादित केला असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे, अशा प्रकारे संपादित व्हिडीओ व्हायरल करणे चुकीचे असून ही आपल्या राज्याची संस्कृती नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.   

सर्वपक्षीय बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी खुर्चीवर बसताना मुख्यमंत्री शिंदे हे काही वाक्य बोलतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकारावर शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.   

सर्वपक्षीय बैठकीनंतर झालेल्या मुद्द्यांवर सकारात्मक बोलू या, अशी चर्चा मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार करीत असताना आमचा संवाद ‘सोशल मीडिया’वरून चुकीच्या पद्धतीने संपादित करून फिरविणे खोडसाळपणाचे आहे. सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

व्हिडीओत असा आहे संवाद?  - मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत येत असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना उद्देशून म्हणत आहेत की ‘आपण बोलून मोकळं व्हायचं ना? बोलायचं आणि निघून जायचं.’ - त्यावर अजित पवार म्हणतात, ‘हो... येस...’ nमुख्यमंत्र्यांना सावध करत फडणवीस त्यांच्या कानात सांगतात ‘माईक चालू आहे.’ तर अजित पवार म्हणतात ‘ऐकू जातं.’ 

टॅग्स :एकनाथ शिंदेमहाराष्ट्र सरकार