लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आपल्याशी ज्या महिलेचे संबंध जोडले जात आहेत त्या महिलेचे दाऊद गँगशी आणि पाकिस्तानशी संबंध आहेत. माझी बदनामी करण्यासाठी खोटे आरोप केेले जात आहेत. युवा सेना जाणीवपूर्वक त्या महिलेला पाठीशी घालत आहे, असा आरोप करतानाच शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी या प्रकरणाची राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करण्यात यावी, अशी मागणी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
यावेळी शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे व त्यांचे वकील चित्रा साळुंखे उपस्थित होत्या. शेवाळे म्हणाले की, माझ्या विरोधात तक्रार करणारी महिला ही व्यावसायिक तक्रारदार आहे. तिच्या संपूर्ण कुटुंबावर याआधीही अनेक गंभीर स्वरूपाच्या तक्रारी दाखल आहेत. या महिलेला सार्वजनिकरीत्या व्यासपीठावर आणले गेले हे गंभीर आहे. यामागे युवा सेना आणि राष्ट्रवादीचे कारस्थान आहे.
त्या महिलेच्या जिवाला धोका आहे. तिचा दाऊदशी संबंध होता तर याचा अर्थ असा घ्यायचा की शेवाळेंनी दाऊदच्या हस्तकाशी संबंध ठेवले आणि तिला देशांतर्गत माहिती पुरवली. शेवाळे यांनी देशाविरोधात काम केले म्हणून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. - रूपाली ठोंबरे-पाटील, नेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस
त्याने आरोप केले आणि तुम्ही गांभीर्याने घेत आहात. पब्लिक सब जानती है. - संजय राऊत, खासदार, शिवसेना
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"