तुम्ही छेड काढताय ती महिला पोलिस नाही ना...? 

By मनीषा म्हात्रे | Published: September 15, 2023 12:42 PM2023-09-15T12:42:21+5:302023-09-15T12:44:03+5:30

वाजत गाजत सार्वजनिक बाप्पांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक मोठ्या मंडळांचा आगमन सोहळा सुरू झाला आहे.

That woman you are teasing isn't the police | तुम्ही छेड काढताय ती महिला पोलिस नाही ना...? 

तुम्ही छेड काढताय ती महिला पोलिस नाही ना...? 

googlenewsNext

मुंबई :

वाजत गाजत सार्वजनिक बाप्पांचे आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक मोठ्या मंडळांचा आगमन सोहळा सुरू झाला आहे. उत्सवाच्या काळात गर्दीचा फायदा घेत टवाळखोरांबरोबर चोरट्यांचीही लगबग वाढते. यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी महिला पोलिस साध्या गणवेशात छुप्या कॅमेऱ्यांसह गर्दीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे, चुकून तुम्ही पोलिसांच्या हाती लागलात तर तुमची काही खैर नाही. 

गर्दीत चोरटे करतात हात साफ 
लालबाग, परळ, गिरगाव, भायखळा, खेतवाडी, अंधेरी, डिलाईल रोड, फोर्ट, चंदनवाडीसह विविध ठिकाणी बाप्पाचे आगमन, दर्शनासह विसर्जनादरम्यान मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. याच, गर्दीत राज्याबाहेरील चोरटे मोबाइलसह किंमती ऐवजावर हात साफ करत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. 

गेल्यावर्षी गणेशोत्सवा दरम्यान झालेले गुन्हे
९ दखलपात्र 
२१ अदखलपात्र 
३० एकूण 

यामध्ये धार्मिक भावना दुखावणे - २, आदेशाचे उल्लंघन - ३, फटाके फोडणे - १, बॅनरवरून - १, विनयभंग-१, पोलिसांसोबत वाद - १ व इतर २१ गुन्ह्यांचा समावेश होता.

1. प्रत्येक पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षकाच्या नेतृत्वाखाली दोन महिला आणि दोन पुरुष अंमलदारांचे निर्भया पथक ऑन ड्युटी २४ तास कार्यरत राहणार आहेत. 
2. छुप्या कॅमेऱ्यासह स्वतंत्र मोबाइल फोन, वाहने पुरविण्यात आली आहेत. निर्भया पथकाकडून कॉर्नर मिटिंग, कार्यशाळेदरम्यान स्वसंरक्षणाची महिलांना माहिती देण्यात येत आहे. 
3. काही मदत हवी असल्यास पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन निर्भया पथकाच्या प्रमुख सुषमा खोत यांनी केले आहे. 

महिलांसाठी हेल्पलाइन : पोलिसांच्या १०० क्रमांकाच्या हेल्पलाइनसह १०३ क्रमांकाची स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली आहे.

Web Title: That woman you are teasing isn't the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.