Join us

असे चालायचे रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:06 AM

पॉर्नोग्राफी प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालिका वेबसिरिजमध्ये काम मिळवून देण्याच्या नावाखाली तरुण, तरुणींना धमकावून पॉर्न चित्रपट करून ...

पॉर्नोग्राफी प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मालिका वेबसिरिजमध्ये काम मिळवून देण्याच्या नावाखाली तरुण, तरुणींना धमकावून पॉर्न चित्रपट करून घेतले जात होते. यात राज कुंद्रा याचे दलाल मुलींचे लैंगिक शोषण करत होते. मुलींना फोन करुन अर्धनग्न अवस्थेत मुलाखत घेत आणि पुढे आमिष दाखवून जबरदस्ती करुन व्हिडिओ शूट करत होते, असाही आरोप करण्यात आला आहे. याबाबतही गुन्हे शाखा तपास करत आहे.

मालमत्ता कक्षाने फेब्रुवारीमध्ये केलेल्या कारवाईत यास्मीन रसूल बेग खान उर्फ रोवा यास्मीन दीपंकर खासनवीस (४०), प्रतिभा नलावडे (३३), मोहम्मद आतिफ नासीर अहमद उर्फ सैफी (३२), मोनू गोपालदास जोशी (२६), भानुसूर्यम ठाकूर (२६), वंदना रवींद्र तिवारी उर्फ गहना वशिष्ठ (३२), उमेश कामत, दीपंकर खासनवीस (३८) यांना बेड्या ठोकल्या होत्या. तर सूरत येथून तन्वीर अकील हाश्मी ऊर्फ टँन (४०) याला अटक केली होती. तो अश्लील व्हिडिओ ओटीटीवर अपलोड करत असून त्याची यात महत्त्वाची भूमिका आहे.

हे पॉर्न चित्रपट हॉटशॉट, हॉटहिट, न्यूफिल्क्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येत होते. यात गहना हिलाही लाखो रुपये मिळत होते. तिने अशाप्रकारे ८० हून अधिक व्हिडिओ प्रसारित केले आहेत. यात आतापर्यंत मालवणीमध्ये दोन तर अर्नाळा पोलीस ठाण्यात एक असे ३ गुन्हे नोंद आहेत.

व्ही ट्रान्सफरच्या माध्यमातून २ जीबी फाइल्स मोफत शेअर केले जाऊ शकते. या वेबसाइटवरील डेटा ७ दिवसांत आपोआप डिलिट होतो. ही मंंडळी लिंक शेअर करण्यासाठी याचाच वापर करत होते.

मालमत्ता कक्षाच्या रडारवर सध्या बॉलीवूडमधील अन्य कलाकार, मॉडेल आणि प्रॉडक्शन हाऊस असून त्यांचाही तपास सुरु आहे.