सराफाची सतर्कता अन् ठग जाळ्यात; हाती पैशांऐवजी बेड्या, चेंबूरमधील प्रकार
By मनीषा म्हात्रे | Published: January 22, 2024 06:17 PM2024-01-22T18:17:51+5:302024-01-22T18:40:00+5:30
पैशांची वाट बघत बसलेल्या ठगांच्या हाती पैशांऐवजी बेड्या पडल्याचा प्रकार चेंबूर मध्ये रविवारी समोर आला.
मुंबई : पत्नी आजारी असल्याचे सांगून बनावट सोनसाखळी सराफाला देत दोघांनी पैशांची मागणी केली. मात्र सोने बनावट असल्याचे लक्षात येताच सराफाने पैसे आणण्याचा बहाणा करत थेट आरसीएफ पोलीस ठाणे गाठले. पैशांची वाट बघत बसलेल्या ठगांच्या हाती पैशांऐवजी बेड्या पडल्याचा प्रकार चेंबूरमध्ये रविवारी समोर आला.
चेंबूर परिसरात राहणारे तक्रारदार सोने व्यापारी चतुर्भुज हिराजी गुजर (४९) यांच्या तक्रारीनुसार, सोने खरेदी विक्रीसह. ते ग्राहकांचे सोने गहाण ठेवून त्यांना पैसे देत असतो. रविवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास
दुकानात काम करत असताना, दोन अनोळखी व्यक्ती दुकानात आले. त्यापैकी एकाने पत्नी आजारी असून त्याला हॉस्पीटलमध्ये पैसे भरायचे आहेत. त्यासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगून जवळील चैन काढून दिल्या. चैन च्या बदल्यात दीड लाखांची मागणी केली. चैनीचे वजन चार तोळे निघाले. त्यांनी सोने तपासले. मात्र त्या सोनसाखळी बनावट असल्याचे समजताच त्यांनी चैन त्यांच्या ताब्यात देत पैसे घेवून येतो सांगून बाहेर पडले. रात्री पावणे दहाच्या सुमारास आरसीएफ पोलीस तेथे आले. त्यांनी चौकशी करताच, ते गोवंडी, देवनार येथील रहिवासी असल्याचे सांगितले. संतोश बसुराज म्हेत्रे (३०) आणि
मुबारक अब्दुल रहीम शेख (३४) अशी दोघांची नावे असून त्यापैकी म्हेत्रे हा बिगारी तर शेख हा रिक्षा चालक निघाला. या दोघांकडे पोलीस अधिक चौकशी करत आहे.