लफडा केल्याचा आरोप करणारेच निघाले लफडेबाज!

By गौरी टेंबकर | Published: April 9, 2023 12:52 PM2023-04-09T12:52:08+5:302023-04-09T12:53:15+5:30

'पुढे लफडा झाला आहे आणि लफडा करणारा तुझ्याच सारखा दिसतो, असे म्हणत दोघांनी एकाचा रस्ता अडवला. त्याची झडती घेतली आणि खिशातले पैसे घेऊन पसार झाले.

The accusers of slander turned out to be slanderers | लफडा केल्याचा आरोप करणारेच निघाले लफडेबाज!

लफडा केल्याचा आरोप करणारेच निघाले लफडेबाज!

googlenewsNext

मुंबई:

'पुढे लफडा झाला आहे आणि लफडा करणारा तुझ्याच सारखा दिसतो, असे म्हणत दोघांनी एकाचा रस्ता अडवला. त्याची झडती घेतली आणि खिशातले पैसे घेऊन पसार झाले. याप्रकरणी सदर व्यक्तीने डी एन नगर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता व अखेर भामट्या पोलिसांना खऱ्या पोलिसांनी जोगेश्वरी परिसरातून गजाआड करण्यात यश मिळवले.

डी एन नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी रात्री ११.५० च्या  सुमारास फिर्यादी हे अंधेरी पश्चिमच्या जमातखाना समोरून पायी त्यांच्या घरी निघाले होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून एका लाल रंगाच्या मोटरसायकल वरून दोन अनोळखी इसम आले. ज्यांनी फिर्यादीला त्यांच्याजवळ बोलवून ते दोघे पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर आगे लपडा हुआ है और लपडा करने वाला इंसान आपके जैसा दिखता है असे बोलून फिर्यादीकडील असलेल्या सामानाची झडती घेऊ लागले. इतकेच नव्हे तर त्या मधून ७ हजार रुपये त्यांनी हातचलाखीने काढून पळ काढला. याप्रकरणी डी एन नगर पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४२०, १७० व ३४ अंतर्गत गुन्हा नोंद केला. डी एन नगरचे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद कुरडे व पोलीस निरीक्षक (गुन्हे ) वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्रीकांत कांबळे, रतन पाटील, मंगेश चव्हाण, पोलीस शिपाई मुकेश धर्माधिकारी, बजरंग भोसले, रणजीत महाडिक , सुमित पोळ व राहुल चौधरी

या त्यांच्या पथकाने घटनास्थळीचे ३० ते ३५ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. ज्यात एक संशयित लाल रंगाची मोटर सायकल व दोन अनोळखी इसम त्यांना दिसले. तर आरोपी हे मेघवाडीच्या ईदगा मैदान परिसरातील आहेत अशी माहिती पठाण यांना मिळाली. अखेर मोहम्मद युसूफ सय्यद उर्फ मुन्नू (४३) आणि याकुब अब्दुल कादिर खान उर्फ आलम (३९) यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ज्यांच्यावर पवई पोलिसातही गुन्हा दाखल असून त्यांच्याकडून चोरलेले सात हजार आणि गुन्हा साठी वापरलेले वाहन हस्तगत करण्यात आल्याचे कुरडे यांनी सांगितले. दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग लोणकर हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Web Title: The accusers of slander turned out to be slanderers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.