हवाई वाहतुकीचा कणा मानल्या जाणाऱ्या ‘हवाई वाहतूक नियंत्रण कक्षा’च्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाली. २२ फेब्रुवारी १९२२ रोजी जॉर्ज जिमी जेफ यांना पहिला एटीसी परवाना जारी करण्यात आला होता.
हवाई वाहतूक नियंत्रक गिल्डचे पश्चिम क्षेत्र प्रमुख सैफुल्ला म्हणाले की, जागतिक हवाई क्षेत्राची ३१० विभागांत विभागणी करण्यात आली आहे. भारतातील हवाई क्षेत्र दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या चार प्राथमिक उड्डाण माहिती क्षेत्रांमध्ये (एफआयआर) विभागले गेले आहे. इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनने भारतीय हवाई क्षेत्राची हद्द पूर्वेकडील क्वालालंपूर आणि यंगूनपासून पश्चिमेला पाकिस्तान आणि मस्कतपर्यंत आखून दिली आहे.
उड्डाण प्रक्रिया पूर्ण होण्यास किती वेळ लागतो?
मुंबई विमानतळावर दोन धावपट्ट्या असल्या तरी त्या एकमेकांना परस्पर छेदत असल्यामुळे एकावेळी दोन विमानांचे उड्डाण करता येत नाही. विमानाची उड्डाण पूर्ण होण्यास १ मिनिटे ५० सेकंदांचा अवधी लागतो.
देशात ३,१६२ हवाई वाहतूक नियंत्रक
३,१६२ हवाई वाहतूक नियंत्रक भारतीय हवाई क्षेत्राचे व्यवस्थापन करतात. ७०० ग्राउंड बेस्ड नेव्हिगेशन, ७२ इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टमच्या मदतीने ते सुरक्षित हवाई सेवा देतात. या एकूण कर्मचाऱ्यांपैकी १६ टक्के महिला आहेत.
हवाई वाहतूक क्षेत्राची व्याप्ती दिवसागणिक वाढत असल्याने २०३० पर्यंत जगाला आणखी ४० हजार, तर आशिया-पॅसिफिक क्षेत्रात १ हजार हवाई वाहतूक नियंत्रकांची गरज लागेल, अशीही माहिती सैफुल्ला यांनी दिली.
तासाला किती उड्डाणे होतात?
कोरोनापूर्वी ४० ते ४६ तिसऱ्या लाटेनंतर ३५ ते ३८
काय आहे विशेष?
मुंबईतील एटीसी टॉवरची उंची - ८५ मीटरनियंत्रणासाठी किती कर्मचारी - ३५० कोरोनाकाळातील दैनंदिन उड्डाणे - ७०० कोरोनापूर्वीची दैनंदिन उड्डाणे - ९५०