Join us

मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेरील भाग खचला, स्थानकात केले बदल

By सचिन लुंगसे | Published: June 28, 2023 8:30 PM

मागाठाणे मेट्रो स्थानकाच्या आत आणि बाहेर जाण्याच्या मार्गात काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

मुंबई :मुंबईच्या पश्चिम उपनगरात सेवा देणाऱ्या मेट्रो रेल्वेच्या मागाठाणे स्थानकालगतची जमीन खचल्याने परिसरात काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र महा मुंबई मेट्रोकडून या घटनेची दखल घेत येथील परिस्थिती सुरक्षित असल्याचा निर्वाळा दिला. शिवाय सुरक्षेच्या कारणात्सव मागाठाणे मेट्रो स्थानकात आत आणि बाहेर जाणारे मार्ग तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. 

ISRO ची महत्वपूर्ण मोहीम; 'या' तारखेला लॉन्च होणार चंद्रयान-3, इंजिनमध्ये केला मोठा बदल

या दुर्घटनेमुळे बांधकांच्या दर्जावर स्थानिकांनी प्रश्न उपस्थित केले असून, कोणाच्या जीवाचे बरे वाईट झाले असते ? तर जबाबदार कोण ? असा सवालही केला आहे. सामाजिक कार्यकर्ता विनोद हणमंत जाधव यांनी सांगितले की, हायवेला वाईट परिस्थिती असून, मेट्रो स्टेशनवरून खाली येणाऱ्या लोकांना चालण्यासाठी रस्ता नाही. पूर्ण रस्ता हायवे सिग्नल पर्यंत चिखलानी माखलेला आहे. ३० ते ४० डंपर येथे उभे असून, अपघात होण्याची भीती आहे, या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण ? असा सवालाही त्यांनी केला आहे.

महामुंबई मेट्रो संचलन महामंडळ काय म्हणते ?

- मागाठाणे मेट्रो स्थानकाच्या आत आणि बाहेर जाण्याच्या मार्गात काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.- महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यावरील काही भाग खचला आहे.- प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन काही तात्पुरते बदल केले आहेत.- मागाठाणे स्थानकाच्या उत्तरेकडील जिना / सरकता जिना तात्पुरता बंद आहे.- उत्तरेकडील लिफ्ट बंद ठेवण्यात आली आहे.- बाधित जागेकडील कॉनकोर्सचा भागही प्रतिबंधित करण्यात आला आहे.- मेट्रो सेवेवर याचा कोणताही परिणाम झाला नाही.

टॅग्स :मुंबईमेट्रो