बाळाला पिशवीतून फेकले खाडीत; आईसह बॉस विरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 01:06 PM2023-10-13T13:06:09+5:302023-10-13T13:06:41+5:30

अनैतिक संबंधातून गर्भवती राहिल्याने महिलेने तिच्या सहकाऱ्यांना पोटात ट्यूमरच्या दोन मोठ्या गाठी झाल्याचे सांगितले होते.

The baby was thrown into the creek; Crime against boss with mother, birth of child from immoral relationship | बाळाला पिशवीतून फेकले खाडीत; आईसह बॉस विरोधात गुन्हा

बाळाला पिशवीतून फेकले खाडीत; आईसह बॉस विरोधात गुन्हा


मुंबई : नवजात बाळाला वांद्रे येथील पुलावरून खाडीत फेकून दिल्याप्रकरणी महिलेसह तिच्या एजन्सीच्या मॅनेजर विरोधात दादर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनैतिक संबंधातून गर्भवती राहिल्याने महिलेने तिच्या सहकाऱ्यांना पोटात ट्यूमरच्या दोन मोठ्या गाठी झाल्याचे सांगितले होते. बाळाला जन्म दिल्यानंतरही गाठी फुटल्याचे सांगून प्रकरण लपविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस चौकशीत सर्व घटनाक्रम उघड झाला आहे.

गरोदर असल्याचे लपवले
ही महिला गेल्या दोन वर्षांपासून दादर येथील एजन्सीमध्ये कार्यरत आहे. या महिलेचे पोट मोठे दिसायला लागल्याने मैत्रिणींनी चौकशी केली. मात्र, पोटात ट्यूमरच्या दोन गाठी झाल्याचे सांगितले. 

९ सप्टेंबर रोजी रात्री घरी असताना पोटात दुखत असल्याने ती स्वच्छतागृहात गेली. बऱ्याच वेळाने ती बाहेर आली. ट्यूमरच्या गाठी फुटल्याने रक्तस्राव झाल्याचे सांगितले. काही वेळाने मैत्रिणीने आत जाऊन पहिले तर कपड्यात बाळ गुंडाळलेले दिसून आले. 

गरोदर असल्याचे लपवून ठेवल्याचे सांगत बाळ मृत जन्माला आल्याचे सांगितले. त्यानंतर, विश्वकर्माच्या सांगण्यावरून जलालुद्दीन याने ते बाळ वांद्रेच्या खाडीत फेकून दिल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

- दादर पोलिसांनी एक महिला आणि तिचा कार्यालयीन सहकारी जलालुद्दीन आलम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही महिला सायन रुग्णालयात दाखल असून पोलिसांनी दोघांना नोटीस पाठवली आहे.
 

Web Title: The baby was thrown into the creek; Crime against boss with mother, birth of child from immoral relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.