नव्या राजकीय युतीची नांदी?: राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र येणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 11:09 AM2022-10-21T11:09:00+5:302022-10-21T11:36:29+5:30

दिपावलीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्क दादर येथे मनसेने दिपोत्सव २०२२ आयोजित केला आहे.

The beginning of a new political alliance?: MNS Raj Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis to come together for Diwali Programme | नव्या राजकीय युतीची नांदी?: राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र येणार 

नव्या राजकीय युतीची नांदी?: राज ठाकरे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस एकत्र येणार 

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकीय आखाड्यात सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढल्याचं दिसून येत आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून राज ठाकरेंच्या घरी भेट देणाऱ्या सत्ताधारी नेत्यांची रिघ लागली आहे. त्यात खुद्द मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे. आगामी राजकीय गणित जुळवण्यासाठी भाजपा-मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्र येणार का? असा प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ लागला आहे. 

दिपावलीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवाजी पार्क दादर येथे मनसेने दिपोत्सव २०२२ आयोजित केला आहे. विशेष म्हणजे याचा उद्धाटन सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे प्रथमच दिग्गज नेते राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येत असल्यानं सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष या कार्यक्रमाकडे लागले आहे. ही नव्या राजकीय युतीची नांदी असल्याचीही चर्चा केली आहे. 

राज ठाकरेंनी केले मुंबईकर जनतेला आवाहन
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी पत्रक काढत या कार्यक्रमाचं आमंत्रण दिले आहे. राज यांनी म्हटलंय की, माझ्या शिवाजीपार्क शेजाऱ्यांनो, तसेच समस्त दादरकर आणि मुंबईकर जनहो, दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसू लागला आहे. गेली काही वर्ष कोरोनामुळे दिवाळी थोडी झाकोळलेली होती, परंतु यावेळेस दिवाळीच्या निमित्ताने वातावरणात पुन्हा उत्साह, आनंद दिसतोय. दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई, म्हणजेच 'दीपोत्सव'  हे गेल्या १० वर्षांपासून जणू समीकरणच बनलं आहे. दरवर्षी आपण शिवतीर्थावर, तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करतो. कोरोनाच्या २ वर्षांत सुध्दा आपण त्या परंपरेत खंड पडू दिला नव्हता. यावर्षी देखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच. त्या दीपोत्सवाचं  निमंत्रण देण्यासाठी हे पत्र लिहितो आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच दीपावलीच्या निमित्ताने आपण आपलं घर, आपलं अंगण आणि आपला परिसर दिव्यांनी उजळवून टाकतो. दादर मधील हा शिवतीर्थाचा परिसर, हे मी माझ्या घराचं अंगणच समजतो, म्हणून हे अंगण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सहभागानं विविध रंगी लखलखणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईनं आणि इतर सजावटीनं आपण उजळवून टाकणार आहोत. मला तर वाटतं की प्रत्येकानं आपल्या घराबरोबर आपलं अंगण आणि आपला परिसर असाच सुंदर ठेवला तर महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा होईल. हे करण्यामागेही माझी तीच भावना आहे. वसुबारसेपासून, २१ ऑक्टोबर २०२२ पासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत, ८ नोव्हेबंर २०२२ पर्यंत, हा दीपोत्सव साजरा होणार आहे. यावर्षी वसुबारसेला म्हणजे २१ ऑक्टोबरला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहोत. आपण अवश्य यावे, आपल्या कुटुंबातील सर्वांना घेऊन या. मित्र मंडळींना सांगा. आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा असं आग्रहाचं निमंत्रण राज ठाकरेंनी मुंबईकरांना दिले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: The beginning of a new political alliance?: MNS Raj Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis to come together for Diwali Programme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.