मुंबईकरांच्या रक्तातील प्रेशर वाढतेय; २६ मधुमेह व रक्तदाब तपासणी केंद्रे सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 12:32 PM2023-10-01T12:32:10+5:302023-10-01T12:33:16+5:30

दोन वर्षांपूर्वी मुंबई पालिकेने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने केलेल्या सर्वेक्षणातून मुंबईकरांना रक्तदाबाचा विकार आणि मधुमेहाने त्रस्त असल्याचे आढळून आले होते.

The blood pressure of Mumbaikars is increasing | मुंबईकरांच्या रक्तातील प्रेशर वाढतेय; २६ मधुमेह व रक्तदाब तपासणी केंद्रे सुरू

मुंबईकरांच्या रक्तातील प्रेशर वाढतेय; २६ मधुमेह व रक्तदाब तपासणी केंद्रे सुरू

googlenewsNext

मुंबई : दोन वर्षांपूर्वी मुंबई पालिकेने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने केलेल्या सर्वेक्षणातून मुंबईकरांना रक्तदाबाचा विकार आणि मधुमेहाने त्रस्त असल्याचे आढळून आले होते. त्यानंतर महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून  शहरातील वैद्यकीय महाविद्यालये, उपनगरीय रुग्णालये व विशेष रुग्णालये मिळून २६ मधुमेह व रक्तदाब तपासणी केंद्र ऑगस्ट २०२२ पासून सुरू करण्यात आली आहेत. त्यामध्ये आतापर्यंत नऊ हजार ६०० रुग्णांना उच्च रक्तदाब आढळून असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने कळविले आहे.

या केंद्रांमध्ये मिळून आजवर ३० वर्षांवरील सुमारे अडीच लाख नागरिकांची तपासणी केली. आरोग्य सेविका व आशा कार्यकर्त्यांमार्फत ३० वर्षांवरील व्यक्तींच्या घरोघरी जाऊन उच्च रक्तदाब तपासणी सर्वेक्षण केले जात आहे. यात आतापर्यंत एकूण दहा लाख ४५ हजार नागरिकांची तपासणी केली. त्यापैकी ६८ हजार नागरिकांना संदर्भित (रेफर) करून नऊ हजार ६०० रुग्णांना उच्च रक्तदाबासाठी निदान व उपचार दिले आहेत.

मुंबईकरांच्या मृत्यूस  हृदयविकार, उच्च रक्तदाब जबाबदार 

पालिका क्षेत्रातील जन्म-मृत्यू नोंदणी आकडेवारीनुसार, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये २०२२ मध्ये नोंदणीकृत मृत्यूंपैकी २५ टक्के मृत्यू हे हृदयरोग, उच्च रक्तदाब व इतर हृदयरोग या आजारांमुळे झाल्याचे आढळून आले आहे, असे या अहवालात नमूद केले आहे.

२०२१ मध्ये मुंबईकरांची तब्येत कशी होते?

  जागतिक आरोग्य  संघटेनच्या सहकार्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने १८ ते ६९ वयोगटातील व्यक्तींचे असंसर्गजन्य आजाराचे सर्वेक्षण २०२१ मध्ये केले होते.

   ३४ टक्के मुंबईकरांना रक्तदाबाचा विकार, १९ टक्के नागरिकांना मधुमेह, दहापैकी नऊ नागरिक गरजेपेक्षा कमी फळे आणि भाज्या खातात, तसेच रोज पाच ग्रॅम मिठाच्या तुलनेत ८.६ ग्राम इतके मिठाचे सेवन करतात.

  ७४ टक्के नागरिक त्यांच्या दिवसभरात पुरेशी शारीरिक हालचाल करत नाहीत. ४६ टक्के नागरिकांचे वजन हे सरासरीपेक्षा अधिक आहे. १२ टक्के नागरिकांमध्ये लठ्ठपणा आढळला आहे.  

निरोगी व आरोग्यदायी जीवनशैलीकरिता १३८ योगा केंद्र सर्व विभागात सुरू केले आहेत. आतापर्यंत २६ हजार ७४२ मुंबईकरांनी योगा केंद्रात सहभागी होऊन लाभ घेतला आहे. यासह अन्य अनेक उपक्रमांच्या माध्यमातून पालिका मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत.

-डॉ. दक्षा शाह, कार्यकारी आरोग्य अधिकारी, पालिका

Web Title: The blood pressure of Mumbaikars is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.