मुंबई-मढ कोळीवाडा, येथील मढ दर्यादिप मच्छिमार सहकारी संस्थेच्या सदस्य विजया लक्षमण कोळी यांची नौका " हिरुआई प्रसन्न" IND-MH-02-MM-6404 बुडाली आहे.
सदर 26 फूट लांबीची नौका मढ किनाऱ्या पासून अंदाजे 8 किमी च्या अंतरावर मासळी घेऊन येत असताना आज सकाळी 8.30च्या सुमारास बुडाली आहे. सदर नोकेतील दोन खालशांना पातवाडी गावातील विष्णू शिमग्या कोळी यांच्या नौकेने वाचविले आहे.मढ दर्यादिप मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष संतोष कोळी यांनी लोकमतला ही माहिती दिली.सदर नौकेचा शोध घेण्यासाठी मढ येथील 30-40 मच्छिमार आज खोल समुद्रात आपल्या बोटी घेऊन गेले होते,पण सदर नौकेचा काही शोध लागला नाही अशी माहिती त्यांनी दिली.
सदर नौका समुद्रातून काढून किनाऱ्यावर आणण्यासाठी मदतीची गरज आहे. तरी आपण संबंधित कोस्ट गार्ड, किंवा आपल्या गस्ती नोकेची मदत मिळावी म्हणून योग्य ती उपाय योजना करावी अशी विनंती संतोष कोळी यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर खात्याचे मंत्री व स्थानिक आमदार अस्लम शेख व संबंधितांना केली आहे.