माहीम-माटुंगा स्थानकादरम्यान गोणीत भरलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह; मुंबईत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 11:22 AM2022-05-25T11:22:45+5:302022-05-25T11:34:06+5:30

गळा चिरून हत्या झाल्याचे उघड

The body of a woman was found in Sack between Mahim and Matunga stations | माहीम-माटुंगा स्थानकादरम्यान गोणीत भरलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह; मुंबईत खळबळ

माहीम-माटुंगा स्थानकादरम्यान गोणीत भरलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह; मुंबईत खळबळ

Next

मुंबई : गोरेगाव पूर्वच्या संतोषनगर परिसरातून सोमवारी बेपत्ता झालेल्या सारिका दामोदर चाळके (३०) या महिलेचा मृतदेह मंगळवारी माहीम आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान गोणीत भरलेल्या अवस्थेत सापडला. महिलेचा गळा चिरलेला आणि पोटावर चाकूने केलेल्या चार जखमा आहेत. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मारेकऱ्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: सकाळी साडेनऊ वाजता ट्रॅकचे कर्मचारी ट्रॅकवर देखभालीचे काम करत असताना त्यांना दोन टँकमध्ये एक पांढऱ्या रंगाची गोणी दिसली. त्यांनी गोणीची तपासणी केल्यावर त्यांना आत एका महिलेचा मृतदेह सापडला. त्यानुसार त्यांनी याची माहिती माहीम स्टेशन मास्टरला दिली. 

मुंबई सेंट्रल जीआरपीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदारी पवार यांनी सांगितले की, जवळपास साडेचार फूट उंची मयत महिलेची असून तिने कुर्ता परिधान केला अधिकाऱ्यांनी मृतदेहाची झडती घेतली आणि तिच्या कुर्त्यामध्ये २०० रुपयांची नोट सापडली, “महिलेची ओळख सांगणारे कोणतेही दस्तऐवज सोबत नव्हते, मात्र तिच्या डाव्या हातावर ‘’दामो’’ असा टॅटू होता आणि तळहातावर मेंदीची डिझाईन होती. 

Web Title: The body of a woman was found in Sack between Mahim and Matunga stations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.