'इंग्रजांना माहिती होतं हा डेंजरस आहे'; फडणवीसांनी सांगितला सावरकर-गाधींजींचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 02:16 PM2023-04-04T14:16:31+5:302023-04-04T14:17:25+5:30
११ वर्षे प्राणांतिक यातना भोगूनही भारत माता की जय म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत.
मुंबई - राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरुन चांगलच राजकारण होताना दिसत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधींनी मै सावरकर नही हूँ, मै गांधी हूँ, और गांधी कभी माफी नही माँगते, असे म्हटल्याने महाराष्ट्रात भाजप आक्रमक झाली आहे. तर, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला जाहीरपणे सुनावल्यानंतरही भाजप आणि शिंदे गटाकडून राज्यात सावरकर गौरव यात्रेची सुरुवात करण्यात आली. त्याच गौरव यात्रेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावकर यांच्या लेखी पत्राचा एक किस्सा सांगितला.
११ वर्षे प्राणांतिक यातना भोगूनही भारत माता की जय म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर आहेत. सावरकर यांच्याशी तुलना कोणाचीही होऊ शकत नाही, म्हणूनच काँग्रेसला सावरकरांची कायमच भीती राहिलीय, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सावरकर आणि महात्मा गांधींचा एक किस्सा सांगितला.
किंग जॉर्ज भारतात आले होते, त्यावेळी सर्वच कैद्यांना सोडून देण्याचं त्यांनी इंग्रजांना सांगितलं होतं. त्यानुसार, सगळ्या राजकीय कैद्यांना सोडून देण्यात आलं. पण, त्याहीवेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांना सोडण्यात आलं नाही. कारण, इंग्रजांना माहिती होतं, हा डेंजरस आहे. हे बाहेर आले की आपलं राज्य उठवल्याशिवाय राहात नाही. त्यामुळे, महात्मा गांधीनी सावरकर यांच्या बंधूंना पत्र पाठवून सावरकरांना इंग्रजांकडे अर्ज करायला सांगितला होता. सगळे राजकीय बंदी सोडले मलाही सोडा. मात्र, सावरकरांना सोडण्यात आलं नव्हतं. गांधींजींनी यावर लेखही लिहला होता, असा सावरकरांच्या पत्राचा इतिहास देवेंद्र फडणवीस यांनी गौरव यात्रेत सांगितला.