मुंबई : मनोज जरांगे यांची दादागिरी वाढत आहे, ती थांबवा. कोणालाही ते शिव्या देतात, हे तुम्ही थांबविणार आहे की नाही? असा सवाल ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मंगळवारी विधानसभेत केला.
भुजबळ म्हणाले, याला टपकावीन, त्याला टपकावीन असे जरांगे बोलत असतात. त्यांना भेटायला आलेल्या अधिकाऱ्यांनाही ते शिवीगाळ करतात. हे सगळे थांबायला हवे.
अध्यक्ष राहुल नार्वेकर यावर म्हणाले की, भुजबळ यांना आलेल्या धमक्यांची सभागृहाने गंभीर दखल घेतली आहे. सरकारने त्यासंदर्भात उचित कारवाई करावी.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हे मनोज जरांगे यांना मान्य नाही. त्यांना ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे. ते सतत भूमिका बदलत असतात. त्यांच्याबद्दल काही बोलले की ते धमक्या देतात. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू दिला जाणार नाही, अशी हमी सरकारनेच दिलेली आहे.
- छगन भुजबळ, ज्येष्ठ मंत्री