व्यावसायिकाचे हिरे पळविले; काळबादेवीतील घटना, त्रिकुटाविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 09:44 AM2023-10-02T09:44:13+5:302023-10-02T09:44:32+5:30

याप्रकरणी एल.टी. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

The businessman's diamonds were stolen; Kalbadevi incident, case registered against the trio | व्यावसायिकाचे हिरे पळविले; काळबादेवीतील घटना, त्रिकुटाविरोधात गुन्हा दाखल

व्यावसायिकाचे हिरे पळविले; काळबादेवीतील घटना, त्रिकुटाविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

मुंबई : काळबादेवीमध्ये व्यावसायिकांची लुटमार सुरूच असून, शनिवारी एका व्यावसायिकाची बॅग पळविल्याची घटना घडली. या बॅगेत सव्वालाख रुपयांचे हिरे हाेते. याप्रकरणी एल.टी. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हिरे व्यावसायिक महादेव साळवे (६६) यांच्या तक्रारीनुसार, २७ सप्टेंबर रोजी काळबादेवी येथील डॉ. व्हिगास स्ट्रीट बसथांब्याजवळ असताना त्रिकुटाने धक्का लागल्याचा जाब विचारत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्रिकुटाने साळवे यांना मारहाण करून त्यांची बॅग हिसकावून पळ काढला. त्यांनी पाठलाग केला. मात्र, आरोपी पसार झाले. साळवे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू असल्याचे एल.टी. मार्ग पोलिसांनी सांगितले.

 वांद्रे परिसरात राहणारे २५ वर्षीय स्वप्नील भगवान पोटे हे ५:३० वाजेच्या सुमारास मालकाची पैशांची बॅग घेऊन जात असताना मे महिन्यात ही घटना घडली.

 काळबादेवी रोड येथील कंसारा चाळ

येथे त्यांच्या मागावर असलेल्या दुकलीने पोलिस असल्याची बतावणी करत चौकशी सुरू केली.

 तरुणाला जबरदस्तीने टॅक्सीमध्ये बसवून ते त्यास रे रोड येथे घेऊन गेले. तेथे त्याच्याकडील ७ लाख रुपयांची रोकड काढून घेत, ती पोलिस आयुक्त कार्यालयात जमा करायचे असल्याचे सांगून निघून गेले.

 फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने तात्काळ एल.टी. मार्ग पोलिस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला.

 पोलिसांनी राज भीमसेन कांबळे (४१), राहुल विलास पेडणेकर (४०), अशी

अटक करण्यात आलेल्या दुकलीला अटक केली आहे.

यापूर्वीच्या लुटीच्या घटना

२७ जून : सोन्याच्या दागिन्यांचे ३३ लाखांचे पार्सल घेऊन निघालेल्या अंगडिया आणि त्याच्या सहकाऱ्यांना चाकूच्या धाक दाखवत लुटल्याची धक्कादायक घटना काळबादेवीत घडली. याप्रकरणी एल.टी. मार्ग पोलिसांनी तिघांना अटक केली होती, तसेच  काळबादेवी परिसरातच  गुंड नीलेश तिवारी, सिल्हराज ऊर्फ काला सिल्व्हा वेलुतंबी पिल्ले व अभिराज खिलारी यांनी त्यांची कार अडवून २५ हजारांची खंडणी मागितली. त्यांनी पैसे देण्यास नकार देताच चाकूच्या धाक दाखवत त्यांच्याकडील सोन्याच्या १२ दागिन्यांचा बॉक्स घेऊन लुटारूंनी पळ काढला.

Web Title: The businessman's diamonds were stolen; Kalbadevi incident, case registered against the trio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.