उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!

By मनोहर कुंभेजकर | Published: May 18, 2023 09:42 PM2023-05-18T21:42:18+5:302023-05-18T21:43:03+5:30

अमोल कीर्तिकरला बळ द्या; उद्धव ठाकरे यांचे आवाहन

The candidature of Amol Kirtikar from the North West Lok Sabha Constituency of Mumbai BMC has been sealed! | उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!

उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब!

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांना आतापासूनच तयारी सुरु केला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटापुढे अनेक मतदारसंघात तगडा उमेदवार शोधणं मोठ आव्हान असणार आहे. मात्र मुंबईत शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांत आपला उमेदवार जवळपास निश्चित केला आहे.

ठाकरे गट उत्तर पश्चिम मतदारसंघात गजानन कीर्तिकरांचे चिरंजीव शिवसेना उपनेते व युवा सेना सरचिटणीस अमोल कीर्तीकर यांना बळ देण्याच्या तयारीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहे. उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये अमोल कीर्तीकारांना साथ द्या! असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन शिबीरात केले अशी माहिती सूत्रांनी लोकमतला दिली.जोगेश्वरी, अंधेरी, दिंडोशी, गोरेगाव विभागातील पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी सदर निर्देश दिले.

जर पुन्हा गजानन कीर्तिकर उत्तरं पश्चिम लोकसभा मतदार संघातून उभे राहिले,तर तुमच्या घरात भांडणे तर नाही होणार ना,यावर मी कट्टर शिवसैनिक असून आपल्या सोबत असून
निवडणूक लढबील अशी ग्वाही अमोल कीर्तिकर यांनी ठाकरे यांना यावेळी दिली.

यावेळी शिवसेना नेते  व माजी मंत्री सुभाष देसाई,माजी मंत्री,आमदार, विभागप्रमुख अँड.अनिल परब,आमदार-विभागप्रमुख सुनील प्रभू,आमदार व माजी राज्य मंत्री रवींद्र वायकर,महिला विभाग संघटक साधना माने,महिला विभाग संघटक राजुल पटेल,उत्तर पश्चिम मुंबईचे शिवसेनेचे विभाग संघटक, विभाग समन्वयक उपविभागप्रमुख माजी नगरसेवक,पदाधिकारी, शाखाप्रमुखं,उपस्थित होते.

मी अमोलला शब्द दिला आहे असे सूतोवाच ठाकरे यांनी केले.तर दिंडोशीतून विद्यमान आमदार,माजी महापौर सुनील प्रभू व जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार व माजी मंत्री रवींद्र वायकर तुम्ही आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच लागा असे आदेश पक्षप्रमुखांनी दिले. 

आगामी मुंबई महापालिका पालिका  निवडणुकीत 227 का 236 उमेदवार लढणार हा प्रश्न न्यायालयात आहे. त्यामुळे पालिका पक्षाच्या उमेदवारीचा निर्णय नंतर घेतला जाईल. तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर झालेला या संबंधीचा संभ्रम दूर करा. येत्या चार माहिन्यात पालिका निवडणूका होण्याची शक्यता असल्याने आतापासूनच शिवसैनिकांनी कंबर कसून कामाला लागा,गाफील राहू नका. भाजप नेते म्हणत आहेत महापौर बसवणार. पण ते कितीही म्हणाले तरी मुंबईत महापालिकेत आपलाच महापौर बसणारच, असे ठामपणे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Web Title: The candidature of Amol Kirtikar from the North West Lok Sabha Constituency of Mumbai BMC has been sealed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.