काडतूस त्यांच्याच बंदुकीतून सुटले, पण..; गोळीबार प्रकरणात सदा सरवणकर यांना क्लीनचीट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 06:14 AM2023-03-11T06:14:55+5:302023-03-11T06:16:36+5:30

गोळीबार हा आमदार सदा सरवणकर यांनी केलाच नसल्याचे शुक्रवारी विधिमंडळात पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.

The cartridge escaped from their own gun Clean chit for Sada Saravankar in firing case mumbai | काडतूस त्यांच्याच बंदुकीतून सुटले, पण..; गोळीबार प्रकरणात सदा सरवणकर यांना क्लीनचीट

काडतूस त्यांच्याच बंदुकीतून सुटले, पण..; गोळीबार प्रकरणात सदा सरवणकर यांना क्लीनचीट

googlenewsNext

मुंबई : मुंबईत प्रभादेवीमध्ये गणेशोत्सवादरम्यान ठाकरे गटासोबत झालेल्या झटापटीत झालेला गोळीबार हा आमदार सदा सरवणकर यांनी केलाच नसल्याचे शुक्रवारी विधिमंडळात पोलिसांनी सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. पोलिसांनी एकप्रकारे सरवणकर यांना या प्रकरणातून क्लीनचीटच दिली आहे. 

गणेश विसर्जनावेळी झालेल्या बाचाबाचीनंतर सरवणकर यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात येत होती.  दादरच्या प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीत ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आले होते. त्यातून उफाळलेल्या वादात पुढे गोळीबार झालेला. हा गोळीबार आमदार सदा सरवणकर यांनी केल्याचा आरोप करण्यात येत होता.  यावर पोलिसांच्या अहवालात त्यावेळी गोळीबार झाला होता. पण सदा सरवणकर यांनी तो गोळीबार केला नव्हता, असा निष्कर्ष काढण्यात आले आहे. 

विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विक्रम काळे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर देण्यात आलेल्या लेखी उत्तरातही हेच नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेले काडतूस त्यांच्या बंदुकीतून सुटले असले तरी ते त्यांनी झाडलेले नाही, असे त्यात म्हटले आहे.

Web Title: The cartridge escaped from their own gun Clean chit for Sada Saravankar in firing case mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.