लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मध्य रेल्वेने कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून लागू असणार आहे. गर्दीच्या वेळी निवासस्थान ते मुंबई कार्यालयाचा प्रवास टाळण्यासाठी दोन शिफ्ट सुरू हाेणार आहे. पहिली शिफ्ट सकाळी ९. ३० ते सायंकाळी ५. ४५ पर्यंत असणार आहे तर दुसरी शिफ्ट सकाळी ११.३० ते सायंकाळी ७. ४५ पर्यंत असणार आहे.
- अनेक कर्मचारी कल्याण, कसारा आणि कर्जतवरून दररोज सीएसएमटी विभागीय कार्यलयात येतात. मात्र लोकलमधील गर्दीमुळे कार्यालयात वेळेत पोहचण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागते.
- कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी नवीन कामकाजाच्या निर्णयामुळे अडीच हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची गर्दीपासून मुक्ती हाेणार असल्याचे रेल्वेने जाहीर केले आहे.