Join us  

 प्रतिक्षा यादीतील ११७ विद्युत सहाय्यक उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी होणार

By सचिन लुंगसे | Published: November 01, 2022 7:57 PM

प्रतिक्षा यादीतील ११७ विद्युत सहाय्यक उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी होणार आहे. 

मुंबई : उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयानुसार प्रसिध्द केलेल्या सुधारित निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या विद्युत सहाय्यक या संवर्गाच्या प्रतिक्षा यादीतील ११७ उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची  परिमंडलनिहाय पडताळणी २ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती महावितरण कडून देण्यात आली. महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची परिमंडलनिहाय पडताळणी मागील तीन दिवसांमध्ये करण्यात आलेली आहे. यामध्ये प्रतिक्षा यादीतील 117 उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. यात अकोला परिमंडल-२, अमरावती परिमंडल -४, औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदीया व लातूर परिमंडलातील प्रत्येकी -२, बारामती  परिमंडल-१७, भांडूप व जळगाव परिमंडलातील प्रत्येकी -११, कल्याण परिमंडल -८, कोल्हापूर परिमंडल- १५, नागपूर व नांदेड  परिमंडलातील प्रत्येकी -५, नाशिक परिमंडल-२१, पुणे परिमंडल-९ व रत्नागिरी परिमंडलातील १ अशा राज्यभरातील एकूण ११७ उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे.

परिमंडलनिहाय प्रतिक्षा यादीतील उमेदवारांनी त्यांच्या नावासमोर नमूद केलेल्या परिमंडल कार्यालयांमध्ये ३ नोव्हेंबर रोजी आपल्या कागदपत्रांची पडताळणी स्वतः उपस्थित राहून करणे अनिवार्य आहे. प्रतिक्षा यादीतील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहणार नाहीत, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल.

 

टॅग्स :मुंबईवीजमहावितरण