Ravindra Waikar ( Marathi News ) : शिवसेना नेते रविंद्र वायकर यांना शिंदे गटाने उत्तर-पश्चिम मुंबई मधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. वायकर यांनी आता प्रचार सुरू केला आहे. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर मैदानात आहेत. दरम्यान, आज रविंद्र वायकर यांनी 'ठाकरे गटात असताना मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. ईडीची कारवाई झाली. तेव्हा जेलमध्ये जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय माझ्याकडे होते', हे वक्तव्य केले यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या वक्तव्यानंतर वायकर यांचे आणखी एक वक्तव्य चर्चेत आले आहे, त्यांनी ठाकरे गटावर आरोप केले आहेत.
मोठी बातमी! दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांना दिलासा, १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर
"माझ्यावर झालेले सर्व आरोप खोटे आहेत. त्यावेळीही म्हटले होते आणि आताही म्हणत आहे. पण आता मी विरोधात उभा आहे, त्यावेळी मला वाचवायला पाहिजे होतं ते वाचवलं गेल नाही, असा आरोपही रविंद्र वायकर यांनी ठाकरे गटावर केला. सत्ता आमची येईलच त्या सत्तेच्या माध्यमातून काम करण्यासाठी उभा आहे, असंही रविंद्र वायकर म्हणाले.
रविंद्र वायकरांचा धक्कादायक खुलासा
ठाकरे गटात असताना मला चुकीच्या प्रकरणात गोवण्यात आले. ईडीची कारवाई झाली. तेव्हा जेलमध्ये जाणे किंवा पक्ष बदलणे हे दोनच पर्याय माझ्याकडे होते. पत्नीचे नावही गोवले गेले, यामुळे पक्षांतर करण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता असा खुलासा वायकर यांनी केला आहे. वायकर यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशावेळी ठाकरे गटानेही हा दावा केला होता. आता वायकर यांनी एक वृत्तपत्रालाच ही मुलाखत दिल्याने मुंबईत शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.