Join us

विविध विभागात मुख्यमंत्री स्वत: गेले... मंत्रालयात केली पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 6:20 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी मंत्रालयात दाखल झाले. यावेळी विविध विभागांना भेटी देत त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

मुंबई :  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी मंत्रालयात दाखल झाले. यावेळी विविध विभागांना भेटी देत त्यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तब्बल दोन वर्षानंतर मुख्यमंत्र्यांनी आज मंत्रालयात बैठका घेतला.

कोविड काळातील निर्बंध आणि त्यानंतर अलीकडेच उद्भवलेले मानेचे दुखणे यामुळे दीर्घकाळ मुख्यमंत्री मंत्रालयात आले नव्हते. चक्रीवादळ आणि नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी २६ जुलै २०२१ ला मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला भेट देत कामकाज केले होते. तसेच, स्वातंत्र्यदिन आदी महत्त्वाच्या प्रसंगी ध्वजवंदनासाठी मुख्यमंत्री मंत्रालयात आले होते. मात्र, दरम्यानच्या काळात कार्यालयीन कामकाज, बैठकांसाठी ते मंत्रालयात नव्हते.

आज मुख्यमंत्री मंत्रालयात दाखल झाले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना फुले वाहून अभिवादन केले.  त्यानंतर विविध विभागांना भेटी देत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तर, त्रिमूर्ती प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रदर्शन लावण्याचे काम सुरू आहे. या तयारीची पाहणी केली. तसेच विविध विभागांना भेटी दिल्या. पेपरलेस कामकाज करून गतिमान कामकाज करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :उद्धव ठाकरेशिवसेना