मुख्यमंत्र्यांनी घेतला मुंबई पदवीधर व शिक्षक मतदार संघ मतदार नोंदणीचा आढावा
By मनोहर कुंभेजकर | Published: December 13, 2023 05:14 PM2023-12-13T17:14:59+5:302023-12-13T17:36:19+5:30
मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही निवडणूकांच्या मतदार नोंदणीकडे विशेष लक्ष घातल्याने पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आता सतर्क झाले आहेत.
मुंबई - येत्या जूनमध्ये होणाऱ्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ या दोन मतदार संघांच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर येथून काल रात्री व्हीसी व्दारे मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या राऊंड पर्यंत किती पदवीधर व शिक्षक मतदारांची नोंदणी केली याचा सविस्तर आढावा घेतला.
विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही निवडणूकांच्या मतदार नोंदणीकडे विशेष लक्ष घातल्याने पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा आता सतर्क झाले आहेत. तर पुन्हा लवकरच आपण या दोन्ही निवडणूका नोंदणीचा आढावा घेवू असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी शिंदे गटाचे मुंबईतील विभागप्रमुख, माजी नगरसेवक शाखाप्रमुख यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी संपर्क साधून त्यांना मतदार नोंदणी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. आणि या दोन्ही निवडणुकांच्या मतदार नोंदणीच्या सत्राची तारिख जाहीर झाल्यावर दिलेल्या नोंदणी सत्रात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे आवाहन केले. यावेळी माजी आरोग्य मंत्री डॅा दीपक सावंत, संजय मोरे, कॅप्टन अभिजीत अडसूळ व शिवाजी शेंडगे हजर होते.