Join us

मुख्यमंत्री बोलतात, आम्ही ऐकतो पण समाधान होत नाही; छगन भुजबळांनी नाराजी व्यक्त केली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 4:36 PM

राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे.

Maratha Reservation ( Marathi News ) : मुंबई- राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा आरक्षणाची मागणी सुरू आहे. या मागमीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन सुरू आहे. २६ जानेवारीपासून जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू करणार होते, पण रविवारी राज्य शासनाकडून राजपत्र आणि मराठा आरक्षणाचा मसुदा घेऊन मराठा आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली. यानंतर लाखोंच्या संख्येने आलेले मराठा आंदोलक परत गेले, या मसुद्यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी आता नाराजी व्यक्त केली आहे.

अंतरवालीत पोहोचताच मनोज जरांगेंच्या चार महत्वाच्या सूचना; मराठा समाजाला सांगितले 'काय करायचे'

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात, आम्ही ऐकतो पण आमच्या मनाच समाधान होत नाही. हे सगळे हट्ट पुरवण्याचे काम सरकार करत आहे. मराठा आरक्षण केले, सारथीमध्ये पण तेच महाज्योतीमध्येही तेच. कुठे तर क्लेरिटी देणार आहात की नाही ओबीसी समाजात. ओबीसी समाजही मतदान करतो. हे सर्व हट्ट पुरवण्याचे काम सरकार करतंय.ज्याप्रमाणे आपण म्हणतो कोणावर अन्याय करणार नाही. आता ५४ लाख दाखल्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यामुळे धक्का लागणारच आहे, असंही भुजबळ म्हणाले.

'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरक्षणावर आम्हाला बोलतात आम्ही ऐकतो परंतु मनाचं समाधान होत नाही, अशी नाराजीही छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.  

शिंदे समितीला मिळालेल्या कुणबी नोंदी जुन्याच

रविवारी राज्य शासनाकडून राजपत्र आणि मराठा आरक्षणाचा मसुदा घेऊन मराठा आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची घोषणा केली. यावर आता ओबीसी नेत्यांनी ओबीसींना चिंता न करण्याच्याचे आवाहन केले आहे. याबाबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रीया दिली. 

"शिंदे समितीला मिळालेल्या ५४ लाख नोंदी जुन्याच आहेत, यामुळे याच्यात काही नवीन काय झाले असं काही म्हणता येणार नाही. नवीन लोक आतमध्ये आले असं काही होणार नाही आणि म्हणून यामुळे ओबीसी आरक्षणाला कुठेही धक्का लागला नाही या मतावर मी ठाम आहे, असं  डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले. 

टॅग्स :छगन भुजबळएकनाथ शिंदेमराठा आरक्षण