मुंबई-मालाड पश्चिम मालवणी येथील टिपू सुलतान उद्यानाच्या नामकरणाचा वाद आता पुन्हा अनेक महिन्यांनी पेटण्याची शक्यता आहे. मालाड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मालकीच्या भूखंडावरील या उद्यानाचे सुशोभिकरण व लोकार्पण दि, 26 जानेवारी 2022 रोजी स्थानिक आमदार अस्लम शेख यांनी मुंबई शहराचे तत्कालीन पालकमंत्री असताना गेल्या फेब्रुवारीत केले होते. हे उद्यान अनेक वर्षांपासून टिपू सुलतान उद्यान या नावाने ओळखले जात असल्याचा दावा करत तेथे टिपू सुलतान उद्यान अशा नावाची पाटी लावण्यात आली आहे. खासदार गोपाळ शेट्टी यांनी तीव्र विरोध करत भाजपाने आंदोलनही केले होते.
उप जिल्हाधिकारी विकास गजरे यांनी आपल्या दि २८ सप्टेंबर २०२२ च्या पत्रान्वये पी उत्तर वॉर्डच्या सहाय्यक उद्यान अधिक्षकांना दिलेल्या पत्रात हा नामकरणाचा प्रश्न त्यांनी पालिकेच्या कोर्टात टाकला आहे. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या दि २२ ऑगस्टच्या पत्राचा संदर्भत देत सदर पत्राद्वारे शासकीय मिळकतीवरील क्रीडांगणास टिपू सुलतान यांचे बेकयदेशीर रित्या दिलेले नाव बदलण्याची विनंती केली होती.तर आमदार असलम शेख यांनी दि,19 सप्टेंबर 2022 च्या पत्रअन्वये या मैदानाला देशाचे थोर स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक कै. अशफाकउल्ला खान यांचे नाव देण्याची विनंती उपनगर जिल्ह्याधिकारी कार्यालयाला केली होती असे विकास गजरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते.
खासदार गोपाळ शेट्टी यांनी लोकमतला सांगितले की, दि, २८ सप्टेंबर २०२२ रोजी या पत्राच्या अनुषंगाने महापालिका सहाय्यक उद्यान अधीक्षक,पी उत्तर विभाग यांना मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय कडून विस्तृत पत्र पाठविण्यात आले होते. परंतू आज मिती पर्यंत महापालिका तसेच मुंबई उपनगर तहसील कार्यालयाकडून कुठलीही हीलचाल या संदर्भात झाली नाही. अद्याप ही मालवणी येथील या गैररीतीने उभारलेले उद्यान व टिपू सुलतान यांच्या नावाने लावलेली पाटी तशीच असल्याने त्यांनी दि, ७ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना एक पत्र पाठवून नाराजी व्यक्त केली.त्यांना दिलेल्या पत्रात मालाड पश्चिम मालवणी येथील उद्यानाचे नामकरण टिपू सुलतान बदलावे, पाटी काढून घेण्यास त्वरित कारवाई करावी आणि संबंधित विभागांना निर्देश द्यावे अशी विनंती त्यांनी केली आहे.