गॅलरीमध्ये बेभानपणे किस करत होतं कपल, पाहत होते हजारो लोक, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 07:16 PM2023-01-06T19:16:39+5:302023-01-06T19:21:07+5:30

Mumbai: सोशल मीडियावर कुठलं काय शेअर होईल आणि कुठला व्हिडीओ व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. अशाच एका व्हिडीओने सध्या  सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

The couple was unconsciously kissing in the gallery, thousands of people were watching, the video from Mumbai went viral | गॅलरीमध्ये बेभानपणे किस करत होतं कपल, पाहत होते हजारो लोक, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल

गॅलरीमध्ये बेभानपणे किस करत होतं कपल, पाहत होते हजारो लोक, मुंबईतील व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

सोशल मीडियावर कुठलं काय शेअर होईल आणि कुठला व्हिडीओ व्हायरल होईल, हे सांगता येत नाही. अशाच एका व्हिडीओने सध्या  सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी नववर्षाच्या पूर्वसंध्येला अनेकांनी खास कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मुंबईतील मरिन ड्राईव्ह चौपाटीवरही सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यावेळचाच हा व्हिडीओ असल्याचे सांगण्यात येत आहे. 

त्याचं झालं असं की, नववर्षाच्या आदल्या रात्री मरिन ड्राईव्हवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. त्यावेळी परिसरातील एका बिल्डिंगच्या बाल्कनीमध्ये एक कपल बेभान होऊन एकमेकांना किस करत होतं. समोरच्या रस्त्यावर हजारोंची गर्दी असल्याचं भानही त्यांना नव्हतं. काही सेकंद चाललेल्या या प्रकारादरम्यान चौपाटीवरील उपस्थित लोक मोठ्याने ओरडून या जोडप्याला ट्रोल करताना दिसत आहेत. तर काही जण या क्षणांचा व्हिडीओ बनवतानाही दिसत आहेत. दरम्यान, गोंगाटामुळे भांबावलेलं हे कपल अचानक खोलीत जाताना दिसते. 

दरम्यान, या व्हिडीओवर सोशल मीडियावरील नेटिझन्सकडून तुफान प्रतिक्रिया येत आहेत. काहीजणांनी हा व्हिडीओ आवडला असल्याच्या कमेंट्स केल्या आहेत. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.   

Web Title: The couple was unconsciously kissing in the gallery, thousands of people were watching, the video from Mumbai went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.