Join us  

संस्कृती महोत्सव रंगणार एशियाटिकच्या पायऱ्यांवर; इंडियन हेरिटेज सोसायटीचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2024 7:48 AM

दोन दिवसीय महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : इंडियन हेरिटेज सोसायटी आणि राज्याचा पर्यटन विभाग यांच्या सहकार्याने १३ आणि १४ जानेवारी रोजी मुंबई संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या महोत्सवाचे ३२ वे वर्ष आहे. यंदा या महोत्सवाची खासियत म्हणजे, प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी हा महोत्सव एशियाटिक लायब्ररीच्या पायऱ्यांवर रंगणार आहे. हा दोन दिवसीय महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य असल्याने नववर्षाच्या सुरूवातीला कलारसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे.

या महोत्सवाची सुरूवात १३ जानेवारी रोजी सुप्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे बासरीवादक राकेश चौरसिया यांच्या ‘कॉन्फ्लुएन्स - म्युझिक फॉर पीस अँड हार्मनी’ अर्थात ‘संगम - शांती आणि सुसंवादासाठी संगीत’ या कार्यक्रमाने होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी १४ जानेवारी रोजी विदुषी अश्विनी भिडे देशपांडे आणि पंडित संजीव अभ्यंकर यांचा ‘भक्ती संगम’ हा कार्यक्रम सादर होईल.

टॅग्स :मुंबई