उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यात रुग्णमित्र अभियानाचा शुभारंभ!

By मनोहर कुंभेजकर | Published: October 8, 2023 04:57 PM2023-10-08T16:57:32+5:302023-10-08T16:57:48+5:30

मुंबई-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरात ५० हजार रुग्णमित्र तयार करण्याच्या भाजपाच्या वैद्यकीय आघाडीच्या महत्वपूर्ण रुग्णमित्र अभियानाचा शुभारंभ ...

The deputy chief minister launched the patient friendly campaign in the state! | उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यात रुग्णमित्र अभियानाचा शुभारंभ!

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यात रुग्णमित्र अभियानाचा शुभारंभ!

googlenewsNext

मुंबई-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यभरात ५० हजार रुग्णमित्र तयार करण्याच्या भाजपाच्या वैद्यकीय आघाडीच्या महत्वपूर्ण रुग्णमित्र अभियानाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थितीत दादर वसंत स्मृती येथे झाला. यावेळी मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार अँड.आशिष शेलार, आमदार  प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड आदींची उपस्थिती होती.

मुंबईत झालेल्या कार्यक्रमात रुग्णमित्र अभियान संयोजक डॉ.अजित गोपछडे व भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, प्रभारी रामेश्वर नाईक, संयोजक डॉ. बाळासाहेब हरपळे, सहसंयोजक डॉ. राहुल कुलकर्णी यांच्यासह वैद्यकीय आघाडीच्या विविध प्रकोष्टचे संयोजक व पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती. 

या अभियानात प्रत्येक गावात  दोन रुग्णमित्र तयार केले जाणार आहेत. या रुग्णमित्रांकडून नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली जाईल. रुग्णाला अँम्ब्युलन्स व सर्व मदत मिळवून देण्याबरोबरच, त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी अद्ययावत व योग्य रुग्णालयाची व डॉक्टर्सची माहिती उपलब्ध होणार आहे. 

रुग्ण मित्र अभियान महाराष्ट्रात पोहचवण्यासाठी आपण व आपली  टीम संपूर्ण महाराष्ट्रात तळागाळापर्यंत जाऊन आरोग्य सेवक टीम प्रशिक्षित करून अहोरात्र परिश्रम करणार असल्याचे डॉ.अजित गोपछडे यांनी सांगितले.या अभियानात सहभागी होण्यासाठी ९६४९४८५२४२ या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा.
 

Web Title: The deputy chief minister launched the patient friendly campaign in the state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.