Join us  

दिव्यांगांना मिळणार पाच लाखांपर्यंत कर्ज! 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2023 4:06 PM

दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी विभागामार्फत कर्ज योजना राबविली जाते. या योजनेतून ५३५ जणांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. 

मुंबई - दिव्यांग वित्त व विकास महामंडळाकडून दिव्यांगांना ५० हजारांपासून पाच लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. जिल्हा कार्यालयात त्याचे अर्ज उपलब्ध आहेत. योग्य कागदपत्रांसह प्रस्ताव सादर केल्यास कर्ज उपलब्ध होते.

दिव्यांगांना पाच लाखांपर्यंत कर्ज दिव्यांग बांधवांसाठी विभागातर्फे दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना, वैयक्तिक थेट कर्ज योजना, हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान अशा योजना असून, त्यासाठी ५० हजार ते ५ लाखापर्यंत कर्ज दिले जाते.

बांधवांनी प्रस्ताव सादर करावे गेल्या पाच वर्षांत अनेक दिव्यांग बांधवांनी अर्ज सादर केले आहेत. जिल्हा कार्यालयात यासंदर्भात अर्ज उपलब्ध आहेत. तेथे दिव्यांग बांधवांना प्रस्ताव सादर करता येतात. 

५३५ जणांना कर्ज दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी विभागामार्फत कर्ज योजना राबविली जाते. या योजनेतून ५३५ जणांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. 

महामंडळाकडून कर्ज दिले गेले आहे. त्यापैकी काहीजणांचे कर्ज थकीत आहे. त्यांनी तातडीने कर्ज परत करावे. जेणेकरून इतरांनाही कर्जाचा लाभ होईल, असे आवाहन विभागाने केले आहे.- युवराज पवार, महाव्यवस्थापन, राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळ 

टॅग्स :मुंबईदिव्यांग