उच्च शिक्षणाच्या संधीचे दार होणार खुले; मुंबई विद्यापीठाचा देश-विदेशातील संस्थांशी करार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 11:53 AM2023-10-20T11:53:23+5:302023-10-20T11:53:51+5:30

देश-विदेशातील ३६ नामांकित उच्च शिक्षण संस्थांबरोबर मुंबई विद्यापीठाने गुरूवारी शैक्षणिक सामंजस्य करार केले. 

The door to higher education opportunities will be open Mumbai University's agreement with domestic and foreign institutions | उच्च शिक्षणाच्या संधीचे दार होणार खुले; मुंबई विद्यापीठाचा देश-विदेशातील संस्थांशी करार

उच्च शिक्षणाच्या संधीचे दार होणार खुले; मुंबई विद्यापीठाचा देश-विदेशातील संस्थांशी करार

मुंबई :

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या धर्तीवर बहुविद्याशाखीय शिक्षणाला चालना देण्यासाठी आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध संधींचे दालन खुले करण्यासाठी देश-विदेशातील ३६ नामांकित उच्च शिक्षण संस्थांबरोबर मुंबई विद्यापीठाने गुरूवारी शैक्षणिक सामंजस्य करार केले. 

मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.  यावेळी  राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महत्त्व विशद करून या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने विविध उच्च शिक्षण संस्थांसोबत शैक्षणिक सामंजस्य करार करण्यासाठी उचललेले पाऊल हे कौतुकास्पद असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

आंतरराष्ट्रीयकरणाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे करार
उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दृष्टिकोनातूनही या करारांचे महत्त्व अधोरेखित होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना अनुभवात्मक आणि कौशल्य प्रशिक्षण, श्रेणी हस्तांतरण, दुहेरी पदवी, सह पदवी, ऑनलाइन आणि प्रत्यक्ष इंटर्नशिप, विद्यार्थी-शिक्षक आदान-प्रदान विविध शैक्षणिक कार्यक्रम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संशोधन अशा विविध क्षेत्रातील संधींचे दालन यानिमित्ताने खुले होणार आहे. 
- प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू

या संस्थांशी करार
सामंजस्य करार केलेल्या संस्थांमध्ये ८ परदेशी विद्यापीठे, युरोपियन कंसोर्सियामधील ७ विद्यापीठे, १० 
औद्योगिक संस्था,  ५ शासकीय संस्था, ३ 
राज्य विद्यापीठे, समीर-आयआयटी मुंबई, 
सेक्टर स्कील काऊन्सिल, स्टार्टअप, एनजीओ अशा संस्था आहेत.

Web Title: The door to higher education opportunities will be open Mumbai University's agreement with domestic and foreign institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.