'ते' १६ जण अपात्र ठरण्याची शक्यताच जास्त, म्हणून...; 'सत्तासंघर्षा'बाबत उद्धव ठाकरेंची महत्त्वाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 12:58 PM2023-02-08T12:58:14+5:302023-02-08T13:08:58+5:30

उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

The Election Commission should not announce the results before the Supreme Court verdict, said that Former CM Uddhav Thackeray | 'ते' १६ जण अपात्र ठरण्याची शक्यताच जास्त, म्हणून...; 'सत्तासंघर्षा'बाबत उद्धव ठाकरेंची महत्त्वाची मागणी

'ते' १६ जण अपात्र ठरण्याची शक्यताच जास्त, म्हणून...; 'सत्तासंघर्षा'बाबत उद्धव ठाकरेंची महत्त्वाची मागणी

googlenewsNext

मुंबई- सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या संदर्भातील निकाल लवकर लागला पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तसेच शिंदे गटाचे १६ सदस्य अपात्र होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने निकाल जाहीर करु नये, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी आज मातोश्रीवर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

...तर उद्या उद्योगपतीही देशाचे पंतप्रधान होतील; शिंदेंच्या बंडाचा दाखला देत उद्धव ठाकरेंचा घणाघात

निवडणूक आयोगाने काय करावं आणि काय करु नये, हे सांगण्याचा आमचा हेतू नाही. मात्र आम्ही निवडणूक आयोगाला सूचित करत आहोत, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. निवडणूक आयोगाने आम्हाला जे काही करायला सांगितले, ते सर्वकाही आम्ही केलं आहे, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. 

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले-

  • पैशांच्या बळावर मुख्यमंत्री होणं योग्य नाही.
  • शिवसेना ही एकच आहे. मी ती वेगळी मानत नाही.
  • सर्व बाजू तपासल्यास शिवसेनेला कोणताही धोका नाही. 
  • सदस्य अपात्रतेचा निर्णय लवकर व्हावा.
  • अंधेरीची निवडणूक लढणार नव्हते तर आमचं चिन्ह का गोठवलं?
  • निवडणूक आयोगानं सांगितलेल्या सर्व गोष्टींची पूर्तता आम्ही केली.
  • पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा कोणताही अधिकार नाही.
  • लोकशाहीचं रक्षण व्हावं, ही निवडणूक आयोगाला विनंती.
  • शिंदे गटाला पक्षाची घटनाच नाही.
  • पाक्षांतर्गत घटनेचं आम्ही पूर्ण पालन करतो.

Web Title: The Election Commission should not announce the results before the Supreme Court verdict, said that Former CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.