टाटा रुग्णालयाचा अनुभव ठरणार दिशादर्शक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 09:42 AM2022-09-19T09:42:23+5:302022-09-19T09:43:06+5:30
वेदांत बाल्को मेडिकल सेंटरशी करार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टाटा मेमोरियल सेंटरने केलेल्या सामंजस्य करारानुसार माहितीची देवाणघेवाण आणि कौशल्ये, क्षमता आणि प्रमुख उपक्रम वाढवण्यासाठी एकत्र काम करतील. रायपूरचे बाल्को मेडिकल सेंटर हे सर्वोत्कृष्ट तांत्रिक आणि वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे विकसित करण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटरच्या कौशल्याचा आणि कर्करोगाच्या उपचारातील दशकांच्या अनुभवाचा लाभ होणार आहे.
दोन्ही कर्करोग रुग्णालयांनी अनेक गोष्टींसाठी परस्पर सहमती दर्शविली आहे. टाटा मेमोरियल सेंटर आणि वेदांत मेडिकल रिसर्च फाउंडेशनचा महत्त्वाकांक्षी उपक्रम, असलेल्या छत्तीसगडच्या रायपूरमधील बाल्को मेडिकल सेंटर यांनी कर्करोगविषयक सेवेत उत्कृष्टता आणण्यासाठी सामंजस्य करार केला. परळच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. आर. ए. बडवे आणि बाल्को मेडिकल सेंटरच्या वैद्यकीय संचालक डॉ. भावना सिरोही यांनी बाल्को मेडिकल सेंटरच्या अध्यक्ष ज्योती अग्रवाल यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षरी केली.
कराराची वैशिष्ट्ये
कर्करोग उपचारांबद्दल सर्वोत्तम पद्धती आणि विकसित होणारे ज्ञान सामायिक करणे. रुग्ण सेवेत उत्कृष्टता आणण्यासाठी बाल्को मेडिकल सेंटर हे नॅशनल कॅन्सर ग्रिड व्हर्च्युअल ट्यूमर बोर्डमध्ये भाग घेईल. दोन्ही ठिकाणी निरंतर वैद्यकीय शिक्षण सत्र आयोजित करणे आणि त्यात सहभागी होणे. संयुक्त संशोधन किंवा बहुकेंद्रित चाचण्यांचे आयोजन करणे.