- संतोष आंधळे मुंबई - जसलोक रुग्णालयात मंगळवारी 24 वर्षाच्या तरुणीचा मेंदूमृत झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या चार रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.या अवयवदानातून दोन किडन्या (मूत्रपिंड), फुफ्फुस आणि यकृत दान केले गेले. हे मुंबई शहरातील 41 वे अवयव दान आहे.
राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही. याकरिता अवयवदान जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.