मुंबईत लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन! दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 08:40 PM2023-09-15T20:40:56+5:302023-09-15T20:41:07+5:30
आज मुंबईत लालबागच्या राजाचे पहिले दर्शन पाहायला मिळाले आहे. यावेळी भाविकांची मोठी गर्दी केली होती.
गणेशोत्सवापूर्वी मुंबईत लालबागच्या राजाचे पहिले दर्शन भाविकांनी आज घेतले. ढोल-ताशांच्या गजरात भाविकांनी पहिले दर्शन घेतले. यावेळी भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. भाविकांनी लालबागच्या राजाचे जल्लोषात स्वागत केले. यंदाचा गणेशोत्सव १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. हा उत्सव १० दिवस चालणार आहे.
Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीच्या दिवशी 'या' पाच चुका टाळा, अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल!
लालबागचा राजा हे मुंबईतील सर्वात लोकप्रिय गणेश मंडळ मानले जाते. या ठिकाणी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मोठमोठे सेलिब्रिटी येतात. या मंडळाची सुरुवात १९३५ मध्ये चिंचपोकळीच्या कोळ्यांनी केली होती. हे मुंबईतील परळ भागात आहे.
लालबागच्या राजाच्या मंडळात भाविकांची मोठी गर्दी असते. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवात सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रीटींना लालबागचे दर्शन घ्यायचे असते. येथे येणाऱ्या भाविकांची प्रत्येक इच्छा श्रीगणेश पूर्ण करतात असे म्हटले जाते. येथे गणेशोत्सव काळात गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतात.
#WATCH | Maharashtra | First look of Lalbaugcha Raja unveiled in Mumbai ahead of #Ganeshotsavpic.twitter.com/wzNaDQ994M
— ANI (@ANI) September 15, 2023