फ्लाईट झाली अर्धा तास लेट, प्रवाशाची क्रु मेंबर, कॅप्टनला शिवीगाळ !

By गौरी टेंबकर | Published: June 25, 2024 12:04 PM2024-06-25T12:04:58+5:302024-06-25T12:05:14+5:30

- इंडिगो एअरलाइन्समधील प्रकार, विमानतळ पोलिसात गुन्हा दाखल.

 The flight was half an hour late the crew member of the passenger abused the captain |  फ्लाईट झाली अर्धा तास लेट, प्रवाशाची क्रु मेंबर, कॅप्टनला शिवीगाळ !

 फ्लाईट झाली अर्धा तास लेट, प्रवाशाची क्रु मेंबर, कॅप्टनला शिवीगाळ !

गौरी टेंबकर, मुंबई: विहित वेळेपेक्षा जवळपास २९ मिनिटे उशिराने टेकऑफ झालेल्या इंडिगो एअरलाइन्सच्या वाराणसी ते मुंबई या विमान प्रवासादरम्यान बंदना संजय मिश्रा नामक महिलेने विमान कर्मचारी आणि कॅप्टनना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. याप्रकरणी तिच्या विरोधात विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

तक्रारदार सोनल जाधव (३४) या इंडिगो एअरलाइन्समध्ये कृ मेंबर म्हणून नोकरी करतात. २५ जून रोजी त्यानी त्यांचे सहकारी अल्मास शेख, ऋतुजा माने, कोमल रहाणे तसेच सिक्युरिटी स्टाफ तैसमिया शेख, दीपक तिवारी, अलांडो गोसावी यांच्यासह विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सदर तक्रारीनुसार १७५ प्रवासी असल्याने गर्दी झालेल्या इंडिगो एअरलाइन्स फ्लाईट क्र. ५२९२ वाराणसी ते मुंबई याठिकाणी त्यांची ड्युटी होती. तसेच ही फ्लाईट २९ मिनिट उशिरा वाराणसी विमानतळावरून टेकऑफ झाली. त्यावेळी विमानातील सीट क्रमांक ९ वरील महिला प्रवासी मिश्रा यांनी विमान कर्मचारी अलमास यांना सीट बदल करून पाहिजे असे सांगितल्याने त्यांना १६ सी ही सीट उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर त्यांनी सीट बदलायला नकार दिला. 

विमान उड्डाण झाल्यानंतर १५ मिनिटांनी मिश्रा ने विमानातील पुढील भागात असलेल्या स्वच्छतागृहाचा वापर केला आणि बाहेर आल्यावर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विमान कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करत विमानातील सेवा सुरू केली, तेव्हाही मोठ्याने ओरडून फुटा निघा येथून हट्ट असे ती बोलू लागली. सदर महिला शांत बसत नसल्याने जाधव यांनी कॉकपीटमधील कॅप्टन लिम्बोन फर्नांडिस यांना फोनद्वारे तसेच प्रत्यक्ष जाऊन माहिती दिली. सदर महिलेने कॅप्टनलाही शिवीगाळ केली आणि विमान उतरल्यावर मी बघून घेईन अशा धमक्या दिल्या. तिच्या शेजारी बसलेल्या प्रवाशांनी सदर महिलेला पाणी पाहिजे असे सांगितल्यावर जाधव यांनी तिला पाण्याची बाटली दिली. मात्र अन्य प्रवाशांनीही तिच्या बाबत तक्रारी केल्या. 

सीट क्रमांक ९ डी आणि १० ई यानी तक्रार फॉर्म भरण्याची तयारी दाखवली. दरम्यान विमान लँड होताना शेवटची दहा मिनिटे असताना सदर महिलेने जाधव यांची माफी मागत पाणी मागितले. तेव्हा कर्मचारी अलमास यांनी तिला पाणी दिले आणि विमान लँड झाले. या महिलेला विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले जी साकीनाक्याच्या टिळकनगर परिसरात राहणारी असल्याचे समजले. तिच्यावर भारतीय दंड संहिता ३३६, तसेच विमान अधिनियम कलम २२,२३ आणि २९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.
 

Web Title:  The flight was half an hour late the crew member of the passenger abused the captain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई