Join us  

शिंदे गटाच्या 'या' १६ आमदारांचं भविष्य टांगणीला; निकालावर ठरेल राजकीय करिअर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 10:53 AM

राज्यात मिशन गुवाहटीच्या सुरुवातील एकनाथ शिंदेंसह आमदारांची मोठी फौज सूरतमार्गे गुवाहटीला गेली होती.

मुंबई- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जाहीर होणार आहे. १४ फेब्रुवारी २०२३ पासून याप्रकरणी नियमित सुनावणी घेण्यात आली. शिंदे गट आणि ठाकरे गट या दोन्ही बाजूचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर १६ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. यावर आता सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम आर शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी एस नरसिंहा यांचे पाच सदस्यीय घटनापीठ निकाल देणार आहे. या निकालामुळे शिवसेनेच्या शिंदे गटातील १६ आमदारांचे भवितव्य टांगणीला लागले असून स्वत: मुख्यमंत्री शिंदेंचाही यात समावेश आहे. 

राज्यात मिशन गुवाहटीच्या सुरुवातील एकनाथ शिंदेंसह आमदारांची मोठी फौज सूरतमार्गे गुवाहटीला गेली होती. त्यानंतर, एकामागोमाग एक असे शिवसेनेचे ४० आणि अपक्ष १० असे एकूण ५० आमदार शिंदेंसोबत गेले. त्यापैकी, सुरुवातीला शिंदेसोबत गेलेल्या शिवसेनेच्या १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाने केली आहे. यासंदर्भात आज तब्बल ९ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निकाल जाहीर होत आहे. या १६ आमदारांमध्ये मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगरसह धाराशिव आणि नांदेडच्याही आमदारांचा समावेश आहे.  

या १६ आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार

एकनाथ शिंदे, कोपरी (ठाणे) तानाजी सावंत, परंडा- अब्दुल सत्तार, सिल्लोड संदिपान भुमरे, पैठण यामिनी जाधव, भायखळा मुंबई भरत गोगावले, महाड संजय शिरसाट, छत्रपती संभाजीनगर प्रकाश सुर्वे, मागाठाणे बालाजी किणीकर, अंबरनाथ लता सोनवणे, चोपडा बालाजी कल्याणकर, नांदेड अनिल बाबर, खानापूर संजय रायमूलकर, मेहकर महेश शिंदे, कोरेगाव- रमेश बोरनारे, वैजापूर  चिमणराव पाटील, संडोल 

टॅग्स :एकनाथ शिंदेतानाजी सावंतसर्वोच्च न्यायालयमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष