मुंबई : पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी येथील रेल ओव्हर पुलाच्या आनंदनगर सबवेच्या गर्डर लाँचचे काम आज पूर्ण झाले. ज्यासाठी प्राधिकरण आणि कंत्राटदार यांच्याकडून एकूण ५० कर्मचारी कार्यरत होते.
सदर काम दि.२९.१०.२०२२ रात्री ११ वाजल्यापासून दि.३०.१०.२०२२च्या सकाळी ६ वाजेपर्यंत सुरू होते. २०० टन क्षमतेच्या २ क्रेन प्रत्यक्ष गर्डर च्या उभारणी साठी वापरण्यात आली समान क्षमतेची एक अतिरिक्त क्रेन स्पेर म्हणून ठेवण्यात आली होती. तसेच १०० टन क्षमतेच्या २ क्रेन गर्डर ठेवण्यासाठी वापरण्यात आली होती. २+२ पथ मर्गिकेच्या पुलाचे ४+४ असे अपग्रेड केल्यामुळे द्रुतगती महामार्गावरील लहान तसेच अवजड वाहनांना फायदा होईल तसेच वाहतूक कोंडी कमी होईल. गर्डरच्या उभारणी नंतर प्रकल्पाचे ८५ टक्के काम पूर्ण झालं आहे.
सदर कामाचा संपूर्ण खर्च एमएमआरडीए करणार असून यासाठी २५८ कोटींचा निधी वापरण्यात येणार आहे. तसेच आत्तापर्यंत प्राधिकरणामार्फत २१० कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. सदर गर्डरच्या उभारणी नंतर पुलाच्या दोन्ही बाजूच्या पोहोचमर्गांच्या काँक्रिटायझेशनचे आणि रेल्वेच्या गर्डरचे काम शिल्लक राहील.