Join us  

"न्यायदेवता मला न्याय देईल"; पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकरांनी व्यक्त केला विश्वास

By मनोहर कुंभेजकर | Published: June 11, 2024 5:46 PM

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात रविंद्र वायकरांनी केला ४८ मतांनी पराभव

मनोहर कुंभेजकर, मुंबई: लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २७- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात माघारीअंती २१ उमेदवार रिंगणात होते. या मतदारसंघात एकूण  मतमोजणी ९५५५०४८ इतकी झालीकीर्तिकरांच्या मते यातच काहीतरी गोम आहे . मंगळवार दि, ४ जून रोजी सकाळी आठ वाजल्या पासून सुरू झालेल्या २७ उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघात प्रत्येक फेरीत कधी शिंदे सेनेचे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकर पुढे तर कधी उद्धव सेनेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या दोघांमध्ये चुरस होती.

इव्हीएम मतमोजणीच्या २६व्या शेवटच्या फेरीत अमोल कीर्तिकर १ मताने पुढे होते. पोस्टल बॅलेट मध्ये  कीर्तिकर यांना १५०१ व वायकर यांना १५५० मते मिळाली. मात्र अखेर वायकर यांनी टपाल मतमोजणीत ४८ मतांनी बाजी मारत निवडणूक जिंकली.वायकर यांना ४५२६४४मते मिळाली तर अमोल कीर्तिकर यांना  ४५२५९६ मते मिळाली.

अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणी प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला असून या निकालाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात येत्या आठवड्यात उद्धव सेना दाद मागणार असल्याची माहिती त्यांनी लोकमतला दिली.निवडणूक यंत्रणा जरी सरकरच्या दावणीला बांधली असली तरी,न्याय देवता मला न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याबाबत अधिक माहिती देतांना अमोल कीर्तिकर म्हणाले की, येथील मतमोजणी प्रक्रियेमध्ये त्रुटी आहेत आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची अखेरची भूमिका ही संशयास्पद होती. १६ व्या फेरीनंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मतमोजणी क्रमांकांच्या प्रिंटआऊट्स उमेदवारांच्या प्रतिनिधींना वितरित केल्या नाहीत (कीर्तिकरांना त्या प्रिंट २५ व्या फेरी नंतर मिळाल्या) तसेच शेवटच्या काही फे-यांचे रिझल्ट्स जाहिर करण्यास विलंब लागत होता. त्यानंतर अधिकाऱ्यांनी निकाल जाहीर करण्यापूर्वीच उमेदवारांच्या प्रतिनिधींना विचारणा केली नाही.  निवडणूक निर्णय अधिकारी पाच मिनिटे गप्प बसले आणि ७.५३ मिनिटांनी निकाल जाहीर केला अशी माहिती त्यांनी दिली.

आम्ही मतमोजणी केंद्राचे व्हिडीओ फुटेज मागितले असून अजूनही ते देण्यात आले नाही असे कीर्तिकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :लोकसभा निवडणूक २०२४ निकालअमोल कीर्तिकररवींद्र वायकरमुंबई उत्तर पश्चिम