मिहिर कोटेचा यांचा पॉडकास्टद्वारे प्रचार, थेट गोपीनाथ मुंडेना केला कॉल 

By मनीषा म्हात्रे | Published: May 3, 2024 01:27 AM2024-05-03T01:27:07+5:302024-05-03T01:29:42+5:30

महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी संध्याकाळी कोटेचा यांनी त्यांचे पॉडकास्ट मराठीत लाँच केले. घाटकोपरमधील भटवाडी येथील समाज कल्याण केंद्रात ते प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्याशी संवाद साधत होते.

The Gopinath Mundena Call was promoted live through podcasts | मिहिर कोटेचा यांचा पॉडकास्टद्वारे प्रचार, थेट गोपीनाथ मुंडेना केला कॉल 

मिहिर कोटेचा यांचा पॉडकास्टद्वारे प्रचार, थेट गोपीनाथ मुंडेना केला कॉल 

मुंबई : मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी उमेदवार वेगवेगळे फंडे वापरताना दिसतात. बुधवारी महायुतीचे आमदार मिहिर कोटेचा यांनी थेट पॉडकास्टद्वारे प्रचार केलेला दिसून आला. गायक अवधूत गुप्ते यांनी त्यांच्या गुप्ते तिथे खुप्ते स्टाईलने  मुलाखत घेतली. याच प्रश्नो्तरात कोटेचा यांनी त्यांचे व्हिजन मांडले. कार्यक्रमाच्या अखेरला, "मुंडे साहेब, नमस्कार, मिहिर बोलतोय" म्हणत भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना कॉल लावून त्यांची आठवण सांगितली. 

            महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी संध्याकाळी कोटेचा यांनी त्यांचे पॉडकास्ट मराठीत लाँच केले. घाटकोपरमधील भटवाडी येथील समाज कल्याण केंद्रात ते प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्याशी संवाद साधत होते. यावेळी मराठी लोकांसाठी कला आणि सांस्कृतिक केंद्र बांधण्याबरोबर मुलुंडमध्ये रेल्वे टर्मिनस उभारण्याबाबत विविध विषयांवर भूमिका मांडली. तसेच, दगडफेक घटनेचा निषेध करत पुन्हा एकदा संजय पाटील यांच्यावर निशाणा साधला.

मुलाखतीच्या अखेरच्या टप्प्यात कुणाला कॉल करण्याची इच्छा असल्याचे विचारताच, त्यांनी गोपीनाथ मुंडेना कॉल करण्याची इच्छा व्यक्त केली. कॉल लावून थेट,  "मुंडे साहेब नमस्कार, मिहिर बोलतोय...साहेब तुम्हीच आम्हाला घडवले. मोठे केले. मला २०१९ मध्ये मुलुंड मध्ये आमदारकीची ईच्छा होती. तेव्हाही तुम्ही म्हणाला निराश होवू नको. तू आमदार होणारच. मी आमदार झालोच. त्याच बरोबर लोकसभेची संधी मिळाली. त्याबाबत मनापासून आभार. आज तुम्ही खूप आठवण येतेय" असे म्हंटले.

पाटलांना दाखवणार आरसा...
गिफ्ट बॉक्स मधील वस्तू कुणाला देणार? याबाबत कोटेचा यांना प्रश्न विचारताच, त्यातील चष्मा आमदार राम कदम तर गुलाब पत्नीला देणार असल्याचे सांगितले. त्यासोबतच आरसा कुणाला दाखवणार विचारणा आरसा महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांना दाखविणार असल्याचे सांगितले. दुसरीकडे, गोट्यांचा उल्लेख करताच त्यांनी एकूण त्या खेळण्यासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता, त्यांना देण्याचा इशारा केला. 

Web Title: The Gopinath Mundena Call was promoted live through podcasts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.