मुंबई - स्वपक्षातील आमदारांनी बंडखोरी केल्याने अल्पमतात आलेल्या उद्धव ठाकरे यांनी काल रात्री मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर शिवसैनिक आणि उद्धव ठाकरेंचे समर्थक त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करत समर्थन देत आहेत. यादरम्यान, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत मनसेकडूनही प्रतिक्रिया समोर आली आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत आम्हाला मनसेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून तीळमात्र सहानुभूती नाही, अशी प्रतिक्रिय व्यक्त केली आहे.
अमेय खोपकर म्हणाले की, प्रत्येक प्रसंगात राज ठाकरे यांचं नुकसान करणाऱ्या, राजसाहेबांची माणसं फोडणाऱ्या, राज ठाकरेंबाबत सतत द्वेषाचं राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला मनसेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून तिळमात्र सहानूभूती नाही. जय मनसे, अशी पोस्ट अमेय खोपकर यांनी केली आहे.
गेल्या आठवड्यात विधान परिषदेचं मतदान आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काही आमदार राज्याबाहेर निघून गेले होते. त्या आमदारांची संख्या वाढू लागल्याने या व्यापक बंडाळीन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले. त्याची परिणती अखेर उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यात झाली.