Join us

राज्यपालांच्या हस्ते रात्र शाळेंच्या माध्यमिक शालांत परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

By मनोहर कुंभेजकर | Published: March 08, 2023 7:19 PM

मुंबईच्या रात्र शाळेला भेट देणारे ते पहिले राज्यपाल

मुंबई-विकास रात्र विद्यालय,सांताक्रूझ(प) व रात्र विद्यालय अंधेरी ( प)  येथील माध्यमिक शालांत परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार महाराष्ट्राचे  राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते मुंबई महनगर पालिका सांताक्रूझ टँकलेन म्युनि.उ.प्रा. येथे झाला. विशेष म्हणजे मुंबईच्या रात्र शाळेला भेट देणारे ते पहिले राज्यपाल आहे.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते महिला दिना निमित्त महिलांचा सत्कार करण्यात आला.तर देणगीदारांनी दिलेले ८ लॅपटॉप त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळेला सुपूर्द केले.तसेच या दोन्ही शाळेच्या प्राचार्यांचा राजपालांनी सत्कार केला.विशेष म्हणजे या दोन्ही रात्र शाळेतील पारितोषिक  मिळवणाऱ्या जास्त महिला आहेत याबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले. राज्यपालांनी दीपप्रज्वलन केले.तर यावेळी नागालँडचे माजी राज्यपाल व उपनगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष पद्यनाभ आचार्य,या दोन्ही रात्र विद्यालयाचे चेअरमन व एक्सेल इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष चंद्रहास देशपांडे,उपनगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष संजीव मंत्री,विकास रात्र विद्यालय,सांताक्रूझचे मुख्याध्यापक प्रभाकर कोठेकर, रात्र विद्यालय, अंधेरीचे मुख्याध्यापक विनायक रुपवते आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राज्यपाल रमेश भैस आपल्या भाषणात म्हणाले की,आमचे २५० जणांचे मोठे कुटुंब होते.घरात राजकारणाचा गंध नव्हता.पण कुश्याभाऊ ठाकरे यांनी मला राजकारणात आणले.पक्षाने कार्यकर्ता,नेता ही दिलेली जबाबदारी नेटाने पार पाडली. स्वतःची कहाणी सांगून कसे पुढे आलो याची माहिती देतांना यावेळी राज्यपालांनी आपल्या बालपणीच्या आठवणी जागवतांना वयाच्या १५ व्या वर्षी मी पेंटिंग तसेच, कार बनवायला शिकलो.या ज्ञानाचा मला पुढे उपयोग झाला.

यावेळी दिवसभर काम करून परिवार चालवत, वेळ काढत चांगल्या मार्काने या दोन्ही रात्र शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी  उत्तीर्ण याबद्दल राज्यपालांनी कौतुक केले.मोठ्या शाळेत आपल्या पाल्याच्या प्रवेशा साठी आई वडिल रांगेत उभे राहतात.त्यांची आर्थिक परिस्थिती चांगली म्हणून त्यांना प्रवेश मिळतो,मग गरिब विद्यार्थी कुठे जाणार असा सवाल त्यांनी केला.शिक्षणाला वय नाही.आपण जे शिकला त्याचा आपल्याला निश्चित उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जे शिक्षण घेतात,आणि गरिबांना शिक्षण देतात त्यांना धन्यवाद देतांना गरीब विद्यार्थी मेरिट मध्ये येतात.विद्यार्थ्यांची प्रतिभा जगवणे आवश्यक आहे.त्यांना प्रोत्साहन मिळाले तर ते पुढे जातात.ज्यांची आर्थिक स्थिती चांगली त्यांचे मन सुद्धा मोठे पाहिजे.आपल्या कडे जे आहे ते गरिबांना द्यावे,दान करण्याची कृती करून आपण गरिब विद्यार्थ्यांना मदत केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. देशाचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी सकाळी घरोघरी वर्तमान पेपरचे वाटप केले,दिवस भर काम करून स्ट्रीट लाईट खाली शिक्षण घेतले हा किस्सा त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितला.

यावेळी पद्यनाभ आचार्य म्हणाले की,वंचितांना शिक्षण देण्यासाठी हा उद्देश.या शाळेचा वटवृक्ष झाला आहे.पाहिले राज्यपाल आहे.चंद्रहास देशपांडे हे कंपनीत मोठ्या पदावर असून या दोन्ही शाळेसाठी चांगले काम करतात.भांडी घासणारी महिला घर आणि संसार संभाळून येथे शिक्षण घेते. नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे आपल्या मातृभाषेत शिक्षण घ्या.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार समजून घ्या.आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्व गुरू असून मी भारतीय आहे या ध्येयाने पुढे जा असे आवाहन त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.

चंद्रहास देशपांडे आपल्या प्रात्यविकात म्हणाले की,वंचितांसाठी शिक्षण या उद्देशाने दिवंगत श्रीराम मंत्री यांनी १९५६ मध्ये जुहू येथे उपनगर शिक्षण मंडळाची स्थापना केली. तर अंधेरी आणि सांताक्रूझ येथे दोन रात्र विद्यालयाची स्थापना केली.या शाळेत आतापर्यंत वयोगट १५ ते ५० पर्यंतच्या १४००० विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले.विशेष म्हणजे अनेकवेळा पाल्य आपल्या पालकां बरोबर शिक्षण घेतात.येथे ५० टक्के महिला शिक्षण घेतात,तर कोविड मध्ये ऑनलाईन. शिक्षण सुरू होते. या  दोन्ही शाळेचा निकाल १०० टक्के लागला असे त्यांनी अभिमानाने सांगितले.

टॅग्स :शाळामुंबई