श्रीकृष्णनगर नदीच्या पूलाच्या कामाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी 

By मनोहर कुंभेजकर | Published: February 25, 2023 04:23 PM2023-02-25T16:23:11+5:302023-02-25T16:23:18+5:30

मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील बोरिवली पूर्व नॅशनल पार्क लगत असलेल्या प्रभाग क्र.११ मधील श्रीकृष्ण नदीवरील पूल धोकादायक

The Guardian Minister inspected the work of Srikrishnanagar river bridge | श्रीकृष्णनगर नदीच्या पूलाच्या कामाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी 

श्रीकृष्णनगर नदीच्या पूलाच्या कामाची पालकमंत्र्यांनी केली पाहणी 

googlenewsNext

मुंबई-

मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील बोरिवली पूर्व नॅशनल पार्क लगत असलेल्या प्रभाग क्र.११ मधील श्रीकृष्ण नदीवरील पूल धोकादायक झाल्याने सदर पूल पाडून येथे मुंबई महानगर पालिकेतर्फे  नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे.       

विभाग क्रमांक एकचे विभागप्रमुख व मागाठाणे विधानसभेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे तसेच  उत्तर मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर यांच्या प्रयत्नाने श्रीकृष्ण नगर नदी पुलाच्या बांधकाम पाहणीसाठी  पालकमंत्री मंगलप्रभात लोढा  तसेच खासदार गोपाळ शेट्टी यांचा पहाणी दौरा आज आयोजित करण्यात आला होता. 

पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी  रस्त्याच्या दुसऱ्या बाजूचा पादचारी पूल उद्या संध्याकाळपर्यंत रहदारीसाठी खुला करा. तसेच पूल दोन्ही बाजूला रस्त्याला उतार करून जोडावा .हे काम देखील पंधरा दिवसात पूर्ण करून पूलाचा पहिला टप्पा रहिवाशांच्या सोयीसाठी नागरिकांच्या रहदारीसाठी खुला करण्यात यावा असे आदेश दिले.तसेच वनविभागाच्या नाहरकत प्रमाणपत्राच्या विषयासंदर्भात तातडीने माहिती सादर करणे जेणेकरून दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होईल. उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी हे तत्वतः मान्य केले.

 या प्रसंगी स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी, उत्तर मुंबई जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष  गणेश खणकर,शिंदे गटाचे 
शिक्षक सेनेचे शिवाजी शेंडगे सर,शाखाप्रमुख सुभाष येरुणकर, राजेश कासार, अमोघ विश्वासरा व सनील माहीमकर,संतोष धावडे, सचिन कदम तसेच भाजप महामंत्री दिलीप पंडित व निखिल व्यास, मुंबईचे उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, दिलीप उपाध्याय, संजय मोरे, आर मध्य वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, कार्यकारी अभियंता सुनील बेंद्रे, पूल विभागाचे अभियंता सचिन सोने आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The Guardian Minister inspected the work of Srikrishnanagar river bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.