राज्यातील ९० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 07:12 AM2023-11-14T07:12:39+5:302023-11-14T07:12:59+5:30

विहिंपचे नियोजन : फोटो अन् अक्षता घरोघरी देणार; प्रत्येक गावातील मंदिरांमध्ये उत्सव

The image of Prabhu Sri Ramachandra will reach 90 lakh families in the state | राज्यातील ९० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा

राज्यातील ९० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार प्रभू श्रीरामचंद्रांची प्रतिमा

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन २२ जानेवारीला होत आहे. त्या आधी महाराष्ट्रातील ९० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचून या सोहळ्याच्या अक्षता आणि प्रभू रामांचा एक लॅमिनेटेड फोटो घरोघरी दिला जाणार आहे. प्रत्येक गावात उत्सव साजरा होईल. 
विश्व हिंदू परिषदेने श्री राम मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून राम मंदिर उद्घाटनाचे सोहळे गावोगावी अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात होतील यासाठी नियोजन केले आहे.

विहिंपचे महाराष्ट्र व गोवा मंत्री गोविंद शेंडे यांनी सोमवारी ‘लोकमत’ला ही माहिती दिली. महाराष्ट्रातील ९० लाख कुटुंबांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीसाठी आर्थिक योगदान दिले होते. त्या प्रत्येकाच्या घरी विहिंपचे कार्यकर्ते पोहोचतील आणि मंदिराबाबत माहिती देणारे एक पत्रक, अक्षता व प्रभू रामचंद्रांचा फोटो देतील. १ ते १५ जानेवारीपर्यंत राज्यभरातील ७० हजार कार्यकर्ते घरोघरी संपर्क करणार आहेत. 

२२ जानेवारीला काय होणार?
२२ जानेवारीला सकाळी ११ पूर्वी प्रत्येक गाव राममय झालेले असेल. ११ वाजता अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होईल. त्या आधी पहाटेपासूनच धार्मिक कार्यक्रम सुरू होतील. रस्तोरस्ती सडे शिंपणे, रांगोळ्या काढणे, पताका, ध्वज लावणे हे सगळे लोकसहभागातून 
केले जाईल. 

Web Title: The image of Prabhu Sri Ramachandra will reach 90 lakh families in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.